जगातील सर्वात महागडी कार. किंमत ५०५ कोटी रुपये फक्त…

जगातील सर्वात महागडी कार. किंमत ५०५ कोटी रुपये फक्त…

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

१९६२-६३ साली फेरारी कंपनीने रेसिंग चाहत्यांसाठी GTO 250 हि कार मार्केटमधे उतरवली होती. या प्रकारच्या फक्त ३६ कार्स कंपनीने बनवल्या होत्या. कार रेसिंग प्रेमींमधे तुफान हिट झाली होती. आजही या गाडीच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे. आणि जगभरात फक्त ३६ कार्स असल्याने या कार ला रिसेल मध्ये खूप मोठी किंमतही मिळत आहे. जगभरातील कार प्रेमी अब्जाधीशांमधे या गाडीची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे आणि हि क्रेझ या गाडीच्या मालकांना अब्जावधी रुपये मिळवून देत आहे.

अशीच एक कार यावर्षी च्या सुरुवातीला तब्बल ७० मिलियन डॉलर्स म्हणजेच ५०५ कोटी रुपयांना विकली गेली आहे. पण इतकी मोठी किंमत मिळणारी फेरारीची हि एकमात्र कार नाही. याआधीही २०१३ साली एका GTO ला ५२ मिलियन डॉलर्स किंमत मिळाली होती तर २०१४ साली एक GTO ३८ मिलियन डॉलर्स ला विकली गेली होती. GTO प्रेमींमधील क्रेझ अशीच वाढत राहिली तर येत्या काळात १०० मिलियन डॉलर्स ला सुद्धा हि कार विकली गेलेली पाहायला मिळेल यात शंका नाही.

आता शेवटचे सर्वात महत्वाचे म्हणजे… हि कार घेणारा एक उद्योजकच आहे. कारण तेवढी क्षमता फक्त उद्योजकांमध्येच असते.

सारांश काय? तर उद्योजक व्हा… कदाचित या कार चा भविष्यातील एखादा ग्राहक आपल्यातीलच असेल…

उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

उद्योजक मित्र

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र

Related Post

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!