उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू करण्याआधी स्वत:ला हे चार प्रश्न विचारा


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय हवे आहे. तुमच्या मनात स्पष्ट चित्र आहे तुम्हाला ते मिळतानाचे, त्याचा अनुभव घेतानाचे, ते करतानाचे. तुम्हाला विश्वास आहे तसं घडेल या विषयी. तुम्हाला माहिती आहे तुम्ही ते डिझर्व करता.
पण तुम्ही तुमचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने कार्य / प्रयत्न सुरू करण्या आधी; खास करून मोठे, महत्वाचे, आयुष्य बदलवून टाकणारे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू करण्या आधी स्वत:ला खलील प्रश्न विचारा

१. मला याची किती गरज आहे ?

तुमच्यात उद्दिष्ट साध्य करण्याची तळमळीची इच्छा आहे का ? का “हे पण मिळालं तर बरे होईल”, ते नाही मिळाले तरी फारसा फरक पडणार नाही, इतकच त्याबद्दल तुम्हाला वाटते?
जर तुमचे उद्दिष्ट / स्वप्न मोठे आहे आणि त्याचा तुमच्या जीवनावर खूप महत्वाचा प्रभाव पडणार असेल, तर तुम्ही ज्याबद्दल व्यासंगी आहात, जे तुम्हाला करायला आवडेल असेच उद्दिष्ट निवडा. असे उद्दिष्ट ज्या बद्दल तुम्हाला फारसे काही वाटत नाही, जे तुमच्या मनाच्या जवळचे नाही, ज्याबद्दल तुम्हाला उत्साह नाही, ते तुम्हाला मागे खेचतील, ते साध्य करण्यात तुम्हाला उशीर होईल, कदाचित तुम्ही ते करू शकणार नाहीत.
या क्षणी तुम्ही हे उद्दिष्ट ठरवण्यासाठी ज्यामुळे प्रेरित झालात त्याविषयी पुनर्विचार करा. तुम्ही ज्या मुळे प्रेरित झालात तेच तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईल.

२. हे माझ आयुष्य कशा तर्‍हेने बदलवून टाकेल ?

तुमचे उद्दिष्ट साध्य झाल्यावर तुमच्यात व्यक्ति म्हणून काय बदल घडेल ? तुमच्या जीवनातील कोणत्या गोष्टी बदलतील, जसे जीवनमान आणि नाती ? जर हो, त्यावर काय परिणाम होईल, कशा प्रकारचे बादल घडतील ?
तुमच्या सभोवतालची माणसे, तुमची परिस्थिति याचे चित्र तुमच्या नजरेसमोर तयार करा. तुमच्या मनात एका सिनेमा सारखे सगळे घडू द्या. तुम्ही जी बघताय ते तुम्हाला आवडते आहे का? त्या क्षणी तुम्हाला जे वाटतय ते तुम्हाला आवडते आहे का?

३. हे मिळवताना मला माझ्या मूल्यांसोबत तडजोड करावी लागणार आहे का?

तुमचे उद्दिष्ट, तुमच्या मूल्यांशी सुसंगत आहेत का, की त्यात विसंगती आहे ? जेव्हा तुम्ही तुमचे उद्दिष्ट ठरविलेत तेव्हा कोणती मूल्य कार्यरत होती ?
जर तुमचे उद्धिष्ट आणि तुमची मूल्य यात सुसंगती नसेल आणि तुम्ही उद्दिष्ट साध्य केलत तर काय परिणाम होतील ? त्या परिणामांना तुम्ही सामोरे जाऊ शकाल का ? तेव्हा तुम्हाला कसे वाटेल ?

४. माझ्या मनाला योग्य वाटते आहे का ?

सरतेशेवटी तुमचे अंतर्मन, तुमची सद्सद्विवेकबुद्धी, तुमचा आतला आवाज तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. जर तुमच्या मनाला योग्य वाटते आहे, तुम्हाला पटते आहे, तर लागा कामाला. जर नाही, तर मात्र फेरविचार करा.

कधी कधी तुमचे उद्धिष्ट गाठण्यासाठी प्रयत्नरत असताना, तुम्ही या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधू शकता. एखाध्या क्षणी जर तुम्हाला असे वाटले की हे तुमच्या साठी योग्य उद्दिष्ट नाही, तत्क्षणी तुम्ही थांबू शकता. जर तुम्ही योग्य दिशेने जाताय याची तुम्हाला खात्री असेल तर तुम्हाला आणखी ऊर्जा मिळत जाईल तुमच्या उद्दिष्टांच्या जवळ पोहचण्यासाठी.

_

निलेश गावडे

ICF accredited CCA Certified Success Coach,
Certified Executive Coach,
Certified Organizational Development Coach,
Certified Emotional Intelligence Coach

www.vivartcoaching.com
Coaching for success in business, career, relationships and life

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!