ग्राहकांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त द्या…

ग्राहकांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त द्या…

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

जपानी कंपनीचा एक किस्सा चांगला प्रसिद्ध आहे…
जपानी कंपनीमधे बाहेर देशातील एका नामांकित कंपनीची ऑर्डर येते. कंपनीला एका प्रोडक्ट चे दहा हजार पीस हवे असतात. ती कंपनी या जपानी कंपनीला पर्चेस ऑर्डर पाठवते, त्यामधे हजार पीस मागे दोन सदोष नग अशी टीप लिहिलेली असते. थोडक्यात हजार पीस मागे २ पीस चे रिजेक्शन मान्य केले जाईल असा त्याचा अर्थ होतो. जपानी कंपनीतले कर्मचारी ती टीप पाहून कन्फ्युज होतात. सदोष नग का हवे आहेत हे त्यांच्या काही लक्षात येत नाही, पण ऑर्डर आहे म्हटल्यावर ती पूर्ण करावी लागणारच. ते दहा हजार पीस चांगल्या गुणवत्तेचे बनवतात, आणि त्यासोबत हजार पीस मागे दोन असे अतिरिक्त वीस सदोष नग बनवून वेगळ्या पॅकिंगमधे बांधून पाठवतात…. त्या जपानी कंपनीला रिजेक्शन हा प्रकारच माहित नसतो. पण ग्राहकाची अपेक्षा आहे म्हटल्यावर ते मुद्दामहून सदोष नग बनवतात आणि पाठवून देतात.

जपानी कंपन्यांच्या यशाचं रहस्य त्यांच्या अति ग्राहकाभिमुख वागण्यात आहे. ते ग्राहकाला नेहमीच त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त देतात. अर्थातच ग्राहक कधीच दुरावत नाही.

आपल्याकडे ग्राहकाला काय हवंय यापेक्षा आपण काय देऊ शकतो याचाच विचार केला जातो. ग्राहकाची अपेक्षा पूर्ण करण्यापेक्षा त्याला फक्त त्याची अपेक्षा पूर्ण केल्यासारखे वाटेल असा देखावा उभा केला जातो, कधी कधी तर जे मिळालंय तेच खूप झालं अशीच ग्राहकाची मानसिकता तयार होते. यामुळे आपल्या व्यवसायात परफेक्शन कधीच येत नाही. आणि परफेक्शन नसलेला व्यवसाय एका मर्यादेपुढे कधीच जात नाही.

ग्राहकाला जे हवंय ते तर त्याला मिळालेच पाहिजे पण सोबतच त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ग्राहक कधी नाराज होणार नाही, आणि तुमच्या व्यवसायाला कधी उतरती कळा लागणार नाही.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!