Manufacturing Industry सुरु करण्याआधी ट्रेडिंग करा


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

कोणताही अनुभव नसताना Manufacturing Industry सुरु करण्यासाठी एकदम मोठी गुंतवणूक करू नका. सुरुवातीला ट्रेडिंग वर भर द्या. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये गुंतवणूकच कमी लागते त्यामुळे तिथे या विषयावर खलबते करण्याची गरज पडत नाही, परंतु उत्पादन क्षेत्रात आणि मुख्यत्त्वे लघुद्योग क्षेत्रासाठी हा महत्वाचा मुद्दा आहे.

Manufacturing Industry साठी मोठी गुंतवणूक करावी लागते. पण जर प्रोजेक्ट चालवण्यात अपयश आले तर मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. कागदोपत्री, प्रोजेक्ट रिपोर्टमधे कितीही चांगली आकडेवारी मांडली तरी सुरुवातील व्यवसाय पुरेश्या वेगाने कधीच चालत नसतो, काही ना काही अडचणी येताच असतात. अशावेळी खर्च, गुंतवणूक, उत्पन्न कशाचाच ताळमेळ बसत नाही, आणि व्यवसाय धोक्यात येण्याची शक्यता वाढते. आपल्याकडील ७०% व्यवसाय बंद पाडण्याचे कारण, हाच चुकलेला ताळमेळ आहे.

एखाद्या प्रोडक्ट चे उत्पादन सुरु करू इच्छीत असाल आधी त्याची ट्रेडिंग करा. ट्रेडिंग कमी गुंतवणुकीत सुद्धा सुरु होऊ शकते. एखाद्या चांगल्या manufacturing industry मधून व्होलसेल रेट मधे माल खरेदी करा आणि स्थानिक मार्केटमधे वितरण करा. ज्या प्रकारे आपण आपल्या कंपनीसाठी मार्केटिंग करणार आहोत त्याच प्रकारे मार्केटिंग करा. दोन तीन वर्षात स्वतःचे हक्काचे मार्केट तयार करा. आणि ज्यावेळी आपल्या  सुरु करावयाच्या कंपनीच्या उत्पादन क्षमतेएवढा किमान खप होईल असे मार्केट तयार झाले आहे असा अंदाज येईल त्यावेळी स्वतःची इंडस्ट्री उभारा. ट्रेडिंग मुळे सुरुवातीच्या काळात नफ्याचे प्रमाण बरेच कमी राहू शकते, परंतु रिस्क रेशो खूपच कमी होतो. आणि हाच कमी रिस्क रेशो तुम्हाला भविष्यातील मोठ्या रिस्क घेण्यासाठी तयार करतो.

दोन तीन वर्ष सेल्स मधे घातल्यामुळे मार्केटचा, सेल्स चा चांगला अंदाज आलेला असतो. ट्रेडिंग करत असल्यामुळे बँकेचे हफ्ते, मोठमोठे खर्च याचा दबाव येत नाही आणि पूर्ण वेळ व्यवसायावर लक्ष केंद्रित करता येते. उत्पादनात अडकून व्यवसायाकडे दुर्लक्ष होत नाही पूर्ण वेळ सेल्स मधे लक्ष देता येते. manufacturing industry मधे सुरुवातीच्या काळात उत्पादनात चुका होण्याची शक्यता असते, यामुळे ब्रँड खराब होऊ शकतो, परंतु ट्रेडिंग करताना अनुभवी उत्पादकांकडून माल घेतला असल्यामुळे खराब मालाचे प्रमाण खूप कमी होते, आणि ग्राहक समाधानाचे प्रमाण चांगले राहते… आणि या सगळ्याचा फायदा, व्यवसाय अपयशी ठरण्याची शक्यता अगदीच नगण्य होऊन जाते.

दोन तीन वर्षांमधे तुमच्या बँक अकाउंट मधेही चांगले व्यवहार झालेले असतील, अशावेळी बँक सुद्धा तुम्हाला व्यवसाय वाढीसाठी, कंपनी सुरु करण्यासाठी कर्ज द्यायला मागे पुढे पाहणार नाही. बँक अकाउंट मधे किमान तीन वर्षे चांगली उलाढाल होत असेल, तुमचे IT Return योग्य प्रकारे फाईल केलेले असतील, तुमचे आर्थिक बाबतीत ट्रॅक रेकॉर्ड चांगले असेल, सिबिल योग्य असेल तर कोणतीही बँक डोळे झाकून कर्ज देते.

व्यवसाय फक्त सुरु करून फायदा नाही, तो योग्य प्रकारे चालणे महत्वाचे असते. म्हणून आधी तो चालवण्याचा अनुभव घ्यावा, ट्रेडिंग करावी, मार्केट तयार करावे, आणि जेव्हा आपण सुरु करू इच्छित असलेल्या कंपनीच्या प्रोडक्शन क्षमतेचे मार्केट तयार होईल त्यावेळी मग इंडस्ट्री उभारून स्वतः उत्पादन सुरु करावे.

प्रत्येक इंडस्ट्रीसाठी हि ट्रेडिंग ची पद्धत प्रभावी आहे असे नाही, परंतु ९०% इंडस्ट्री साठी हि पद्धत नक्कीच प्रभावी आहे.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील

Total Page Visits: 5667 - Today Page Visits: 1

One thought on “Manufacturing Industry सुरु करण्याआधी ट्रेडिंग करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!