कृषिपूरक व्यवसायाची वाट, हीच ग्रामीण विकासाची पहाट


कृषिपूरक व्यवसायाची वाट हीच ग्रामीण विकासाची पहाट

शेतीउद्योग हा पूर्णतः निसर्गावरच अवलंबून असून अलीकडील काळात वातावरणात होणारे सतत चे बदल, आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल होतानाचे चित्र आपण सर्वत्र पाहत आहोत आणि त्यातली त्यात सततच्या बदलत्या चुकीच्या सरकारी धोरणांमुळे आणि अखंड न मिळणाऱ्या विजेमुळे हाताला आलेले पिक शेतकऱ्यांना गमवायला लागते. शेतीतील सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे शेतीत काम न करायच्या मानसिकते मुळे मजुरांची संख्या कमी होऊन वेळेला मजूर उपलब्ध न होणे. यामुळे हाताला आलेली पिके बऱ्याचदा वेळेवर न काढल्यामुळे वाया गेलेली आपण सर्वत्र ऐकतो आणि यातूनच दिवसेंदिवस शेती करणे अवघड होत चालले आहे, एवढे करूनही जर पूर्ण वर्षाचा एखाद्या पिकाचा ताळेबंद लावला तर पूर्ण वेळ शेती करणाऱ्या किती शेतकऱ्यांना शेती परवडते हे सर्वांना चांगलेच ठाऊक आहे म्हणूनच आजकाल ची तरुण पिढी हि शेतीला काहीतरी जोडधंदा असावा म्हणून शेती पूरक व्यवसायांकडे वळत आहे आणि ती काळाची गरज पण आहे.

प्रथमतः बऱ्याच लोकांना शेतीपूरक व्यवसायांमध्ये काय काय करावे आणि कसे करावे याबद्दल अजिबात माहिती नसते किवा या मध्ये आपण काय काय करु शकतो हे हि माहित नसते शेतीपूरक व्यवसायामध्ये काही वेगळे करायचे असते असे काही नाही पण शेतीपूरक व्यसायामध्ये आपण असे काही करू शकता कि त्यामुळे तुम्हाला पैसा आणि प्रतिष्टा ह्या दोन्हीही गोष्टी मिळू शकतात ज्या कि तुम्ही करत असलेल्या शेतीमधून क्वचितच मिळू शकाल.
शेतीपूरक व्यवसायामध्ये आपण खूप काही व्यवसाय करू शकतो या मध्ये जसे कि गायी म्हशी पालन, शेळीपालन, कुक्कुटपालन, मधमाशी पालन. आणि खूप काही हे आपण आपल्याच घरात लहानपणीपासून पाहत आलेले असतो पण ते कमी प्रमाणात आणि वडील आजोबा यांच्यापासून केलेले पारंपारिक पद्धतीने असते पण त्यामध्ये १-५ या प्रमाणात किवा थोडे कमी अधिक प्रमाणात केलेले असते पण त्याचा उद्देश हा फक्त घरगुती वापरासाठीच हा उपयोग असतो आणि तो कधीही वाढत नाही किवा त्याकडे कधी व्यावसायिक दृष्टीने पाहिले जात नाही कारण आपला एक असा समज असतो की यातून घरच्या गरजा भागल्या कि आपण खुश होतो पण आता असे नाही; वाढते शहरीकरण आणि वाढत्या गरजा भागवण्यासाठी दिवसेंदिवस लागणाऱ्या गोष्टींची चणचण भासत असून त्यातूनच शेतीपूरक व्यवसायांवर शहरानजिक मोठे मोठे उधोग उभे राहत आहेत आणि ते आता ग्रामीण भागात हि पोहचत आहेत आणि यावरून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना नक्कीच चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत आणि भविष्यात आणखी वाढती मागणी पाहता शेतीपूरक व्यवसायांना सोन्याचे दिवस नक्कीच येणार याची खात्री आहे

शेतीपूरक व्यवसाय करताना अडचणी आहेत:-
सर्वप्रथम आपण शेतीपूरक व्यवसायांकडे पाहण्याची मानसिकता बदलली पाहिजे. अजूनही आपल्याकडील समाज व्यवस्थेमध्ये वयाला महत्व आहे, अनुभवला आणि शिक्षणाला काहीही किमत दिली जात नाही. आणि हीच तर सर्वात मोठी महत्वाची बाब शेतीपूरक व्यवसायाला ग्रामीण भागात सतत आडवी येणारी आहे. आजकाल ग्रामीण भागात एखाद्या तरुणाने काही वेगळ्या पद्धतीने शेतीमध्ये किवा शेतीपूरक व्यवसायामध्ये बदल करायचा निर्णय घ्यायचा ठरवला तर त्याला शंभर लोक आडवे येणार {या आडव्या येणाऱ्यांनी त्यांच्या पूर्ण जीवनात कधीही त्या वाटेवर जाण्याचाही साधा विचार केलेला नसतो परंतु त्याचे वयानुसार सल्ले चालू होतात} अमक्याने असे केले होते त्याचे तमुक झाले, तू काय असे वेगळे करणार आहेस तू काय वेगळा लागून गेलास, याकडे एवढे पैसे होते त्याला नाही करता आले, त्याकडे तेवढे होते तो डूबला आपण तर त्यांच्यापुढे काहीच नाही, आपली एखादी नौकरी करावी ज्याने कि महिन्याला पगार मिळेल हे आणि असे सॅले दिले जातात, यामुळे आपल्याकडे ग्रामीण भागातील ९०% तरुण काही कृषिपूरक व्यवसाय करण्याचे धाडस करत नाहीत आणि जरी धाडस करून व्यवसाय केला तरी ते तेवढ्या ताकतीने पुढे जात नाहीत कारण त्यांना अगोदरच पूर्ण खचून टाकले जाते. यातले जे उरलेले १०% टक्के तरुण आहेत कि ज्यांनी ठरवलेले असते की आपण काहीतरी करून दाखवायचे आणि ते करूनही दाखवतात आणि तीच १० टक्के लोक पुढे या व्यवसायात प्रतिनिधित्व करतात आणि नावारूपाला येतात.

आपल्या भागात पारंपारिकतेला खूप महत्व आहे पारंपारिकतेला सोडून काहीतरी आधुनिक प्रयोग शेतात करायला लोणीही तयार नाही त्याची बरीच कारणे आहेत त्यात काहीना असे वाटते कि खर्च खूप लागतो किवा त्यांनि या गोष्टी कधी पाहिलेल्याही नसतात किवा त्यावर विचारही केलेला नसतो व सर्वात महत्वाचा धोका त्यांच्या मनात एकाच असतो कि आपण जे चालू करू त्यात जर अपयश आले तर पुढे काय आणि सर्वात मोठा विचार एकाच असतो कि ‘लोक काय म्हणतील’ या एका विचाराणे ग्रामीण भागातील बऱ्याच लोकांना काही सुरवात करण्या अगोदरच संपून टाकतो. बऱ्याच लोकांची सुरवातच पुढे हे होईल कि नाही यापासून झालेली असते ते पुढे कधीही वेगळ्या वाटेवर जाण्याचा निर्णय घेत नाहीत आणि मग वर्षोन वर्षे उमेदीच्या काळात नौकरी शोधण्याच्या मागे पाळतात आणि शेवटी बराच काल निघून जातो आणि मग काहीच नाही म्हणून काहीतरी कारावे लागते आणि उम्मेदीचा काळ संपल्यावर शेती करायला उतरतात आणि मग तेवढया ताकतीने शेती होत नाही आणि मग शेती आणि शेतीपूरक व्यवसायाला नावे ठेवली जातात हि आपल्याकडील शोकांतिका आहे.

काही ग्रामीण भागात शेळीपालन, कोंबडी पालन या व्यवसायाला आजही बरेच लोक दुय्यम दर्जा देतात हि खूप घाणेरडी मानसिकता आपल्याकडे पाहायला मिळते कुणी विचार जरी बोलून दाखवला कि मी कुक्कुटपालन करायचा विचार करतोय तर लगेच समोरचा बोलणार दुसरा काहीच उदयोग नाही राहिला का असे बोलून लगेच नाक मुरडायला लागतात.बऱ्याचदा ग्रामीण भागात शेतीपूरक व्यवसायाला विरोध हा प्रथम सुरु होतो तो हि आपल्या स्वतःच्या घरातूनच आणि मग तो वाढत जाऊन गावभर फोह्चतो पण असे न होता जर घरच्या मंडळीनी समजावून घेऊन सहकार्य केले तर नक्कीच शेतीपूरक व्यवसाय हा खूप मोठा होऊ शकतो आणि तसे उदाहरण पण आहेत पण जास्त उदा हे विरोध पत्करून मोठे झालेली खूप लोक आपणास पाहवयास मिळतील आणि ज्यांना विरोध होतो अश्या लोकांनी नक्क्कीच विरोधातून काहीतरी करून दाखवले आहे त्यांचा आदर्श जरूर घ्यावा.

धन्यवाद

सुरेश गुलगे
८६०५३५३२१२
संचालक,
मंगल अँग्रो फार्म
नेवासा, अहमदनगर

(लेखाचे सर्व हक्क व उद्योजक मित्र व मंगल ऍग्रो फार्म यांचेकडे राखीव आहेत)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!