अॅव्हेंजर्स – इन्फिनिटी वॉर ची जाहिरात स्ट्रॅटेजी लक्षात घेतली का?


“अॅव्हेंजर्स – इन्फिनिटी वॉर” चित्रपट रिलीज झाल्यापासून तुफान हिट होत आहे. दररोज कमाईचे नवनवे आकडे समोर येत आहेत. पण या चित्रपटाची जाहिरात खूप कमी प्रमाणात होती. तरीही चित्रपट मात्र बॉक्स ऑफिस वर तुफान हिट होत आहे. विशेष जाहिरातबाजी नसताना एखादा हॉलिवूड चित्रपट आपल्याकडे इतका हिट कसा होऊ शकतो ? हिट होण्यासाठी किमान त्याबद्दल लोकांना काही माहिती तर असायला हवी ना !!! खरं तर अॅव्हेंजर्स ची प्रत्यक्षपणे पुरेशी जाहिरात केली गेलेली नसली तर अप्रत्यक्षपणे या चित्रपटाची ची जाहिरात मागील सहा महिन्यांपासून सुरु आहे.

अॅव्हेंजर्स ने केलेली अनोखी मार्केटिंग आपल्या अभ्यासासाठी अतिशय उपयुक्त आहे. भलेही अॅव्हेंजर्स ने चित्रपटाची जाहिरात फारशी केली नसेल परंतु मागील सहा महिन्यांपासून कोणत्या ना कोणत्या हिंदी चित्रपट चॅनलवर अॅव्हेंजर्स चित्रपटाचे मागील भाग कायम दाखवले जात आहेत. यातील सुपरहिरोंचे विविध चित्रपट नेहमीच बघायला मिळत आहेत. याचा परिणाम म्हणजे चित्रपटाचे नाव, त्यातील कलाकार, प्रत्येकाची सुपरपॉवर, चित्रपटाचा गाभा या बाबी प्रेक्षकांना आधीच माहित झाल्या. आता प्रोड्युसर ला फक्त त्याचा पुढचा भाग रिलीज करायचे बाकी राहिले होते. अॅव्हेंजर्स चे पहिले दोन भाग मीसुद्धा कितीतरी वेळा TV वर पहिले आहेत. आणि त्याचाच प्रभाव म्हणून मी सुद्धा चित्रपट रिलीज झाल्यापासून तो बघण्यासाठी उत्सुक होतो, आणि पाहीलाही.

अप्रत्यक्ष मार्केटिंग साठी हा चित्रपट उत्तम उदाहरण आहे. चित्रपटाच्या पूर्वीच्या भागांनी या चित्रपटाला एवढ ओळखीचं करून टाकलं कि यातील एकही कलाकार माहित नसलेले माझ्यासारखे कितीतरी प्रेक्षक या चित्रपटाला मिळाले. याला अप्रत्यक्ष मार्केटिंग म्हणता येईल. एखादी गोष्ट त्रयस्थ मार्गाने एवढी ओळखीची आणि सवयीची करून टाकावी कि ग्राहकाला ती त्यांच्या नेहमीच्याच जीवनशैलीचा भाग वाटावी, आणि आपसूकच तो तुमच्याकडे आकर्षित व्हावा. अॅव्हेंजर्स ने आपली जाहिरात करण्यापेक्षा आपले मागील चित्रपट (म्हणजेच प्रोडक्ट) किती उत्तम आहे हे प्रेक्षकांना दाखवून दिले आणि प्रेक्षक स्वतःहूनच तिसऱ्या भागाची वाट पाहायला लागले.

अशा गोष्टी व्यवसायिक दृष्ट्या आपल्यासाठी अभ्यासण्यासारख्या आहेत. अशा स्ट्रॅटेजी आपल्याला काहीतरी नवीन कल्पना सुचवून जातात. अॅव्हेंजर्स ने सुद्धा माझ्यासाठी हेच काम केलंय.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

श्रीकांत आव्हाड

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!