श्रीमंत व्हा… मानसिकतेने आणि संपत्तीनेही


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

आपल्या गरिबीचे कौतुक करणारे खरं तर मनातून हरलेले असतात… पैसे प्रत्येकालाच कमवायचे असतात, पण आपली मर्यादा लक्षात अली कि श्रीमंतीपेक्षा आपली गरिबी किती चांगली हे कौतुकाने सांगायची सुरुवात होत असते. मग हे पैसा सर्वस्व नाही छाप वाक्ये समोरच्याच्या कानावर आदळवली जातात… पण हे वाक्य फक्त श्रीमंतांच्याच तोंडी शोभतं, गरीबाच्या नाही हे लक्षात घ्या.

श्रीमंत होणे हा आपला हक्क आहे, ती कुणाचीही मक्तेदारी नाही. टाटा, अंबानी, बिल गेट्स, झाकेरबर्ग, बफे, बेझोस हे लोक आकाशातून पडलेले नाहीत कि त्यांच्याकडे श्रीमंती चालून आलीये. यांनी आपल्या कष्टाने मेहनतीने आपले अस्तित्व निर्माण केले आहे, आपले उद्योगविश्व उभे केले आहे. या पंक्तीत बसण्याची जगातील प्रत्येकाला संधी आहे.

जगातील अतिश्रीमंतांची यादी पहिली आणि त्यांच्या व्यवसायाची सुरुवात त्यांचा इतिहास पहिला तर लक्षात येईल कि यातल्या ९०% श्रीमंतांची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती किंवा अतिशय हलाखीची होती, यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात अतिशय कमी पैशातूनच केलेली होती… पण आपल्या बुद्धीच्या, कौशल्याच्या, निर्णयक्षमतेच्या बळावर या लोकांनी आज जगातीकी उद्योगविश्वावर आपले अढळ स्थान निर्माण केलेले आहे.

आपण पैशाने नाही मनातून गरीब आहोत. पैसा आपल्या आसपास आहे, तो आपली वाट पाहतोय, पण आपण “या लोकांइतके मोठे होणे आपले काम नाही ते मोठ्या लोकांचे काम आहे’ असली विद्वत्ता पाजळत बसलो आहोत. आणि जो पैसा आपली वाट पाहत आपल्या आसपास रेंगाळत बसलाय त्याला आपल्यापासून दूर जायला भाग पडतोय. पैसा तुमची वाट पाहण्यात आपला वेळ वाया घालवत नाही, त्याच्यासाठी झगडणाऱ्याकडे तो स्वतःहून जातो. पैसा हा लाहुचुंबकासारखा असतो… तो त्याच्याकडेच जातो जो त्याचा विचार करतो, त्याच्या प्राप्तीसाठी सतत प्रयत्न करतो. पण इथे तर आपण स्वतःलाच कमी समजतोय, स्वतःलाच भिकारी समजून वागतोय, आपण ठरवून घेतलाय कि श्रीमंत होणं माझ्या नशिबात नाही. पोटापाण्यापुरतं मिळालं तरी पुरे हे आपण स्वतःलाच दररोज ओरडून ओरडून सांगतोय…. बाबांनो पोटापाण्यापुरतं नाही माझी स्वप्न पूर्ण करण्यापुरती तरी श्रीमंती मला मिळवायचीच आहे हे स्वतःला सांगणं आवश्यक आहे. फक्त आपलं स्वप्न घर आणि गाडी घेण्यापुरते मर्यादित असू नये.

श्रीमंतीची असं बाळगणे यात काहीच गैर नाही. हा प्रत्येकाचा हक्क आहे. ज्याला या हक्काची जाणीव होते तो श्रीमंत होतोच. बाकीचे ते आपले काम नाही याच भ्रमात वावरतात. तुम्ही आत्ता श्रीमंत नसतालही, त्याने काहीच फरक पडत नाही… पण म्हणून आपल्या गरिबीचे कौतुक करण्यात काहीच हाशील नाही. तुम्ही मानसिकतेने गरीब असाल तर भविष्यातही तुम्ही श्रीमंत होण्याची काडीचीही शक्यता नाही.

श्रीमंती म्हणजे फक्त भरमसाठ पैसे कमावणे असे नाही… तर तो कमावलेला पैसा मनसोक्तपणे उपभोगता येणे म्हणजे श्रीमंती… त्या पैशाचा उपभोग घेण्यासाठी पुरेसा वेळ असणे म्हणजे श्रीमंती. पैसा कमवा आणि त्याचे नियोजन असे करा कि त्याचा पूर्णपणे उपभोग घेता येईल.

आणि हो जगातील सर्व अब्जाधीश हे उद्योजकच आहेत. दोन पाच कंपन्यांचे CEO सोडले तर जगभरात श्रीमंत हे फक्त उद्योजकच आहेत... श्रीमंती व्यवसायानेच येते, नोकरीने नाही. टॅक्स वाचवण्यासाठी इन्शुरन्स पॉलिसी काढणारे कधी श्रीमंत होत नाहीत. पैसे वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे श्रीमंत होत असतात.

व्यवसाय, गुंतवणूक, नियोजन हेच फक्त श्रीमंतीचे मार्ग आहेत… मानसिकता श्रीमंत ठेवा, पैशाने श्रीमंत नक्कीच व्हाल…

उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


One thought on “श्रीमंत व्हा… मानसिकतेने आणि संपत्तीनेही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!