व्यवसायात जाहिरातीचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम

व्यवसायात जाहिरातीचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

जाहीरात दोन प्रकारची असते… एक प्रत्यक्ष फायदा (direct effect) मिळविण्यासाठी व दुसरी अप्रत्यक्ष फायदा (indirect effect) मिळविण्यासाठी….

बहुतांश जाहीराती दुसऱ्या वर्गातल्या असतात…

जाहिरात केली म्हणजे लगेच तुमच्याकडे ग्राहकांची रांग लागली पाहिजे असे नसते. जाहिरात मुख्यत्वे केली जाते ती तुमचा ब्रँड लोकांच्या लक्षात राहण्यासाठी. याला indirect effect म्हणतात. लोकांना सारखा सारखा तुमचा ब्रँड नजरेस पडत असेल तर संबंधित वस्तू, सेवा खरेदी करताना ते तुम्हाला सुद्धा विचारात घेतात. तुमची जाहिरात सारखी डोळ्यासमोर असल्यामुळे तुमचा ब्रँड ग्राहकांसाठी ओळखीचा होऊन जात असतो. साहजिकच तुमचे प्रोडक्ट, सेवा जेव्हा त्यांच्यासमोर येते त्यावेळी ते त्यांना नवीन वाटत नाही, आणि कोणतेही आढेवेढे न घेता ते तुमचे प्रोडक्ट, सेवा खरेदी करतात.

लक्स साबण आपल्या सगळ्यांच्या ओळखीची आहे. इतक्या वर्षांपासून मार्केटमधे आहे. देशात क्वचितच एखादा सापडेल ज्याला लक्स ब्रँड माहित नाही. मग तरीही ते आजही त्यांची जाहिरात का करतात? ते त्यांचा ब्रँड लोकांच्या डोक्यात घोळत राहील याची काळजी घेतात… सलग वर्षभर जर लक्स ची जाहिरात आली नाही तर तो ब्रँड लोकांच्या विस्मरणात जाईल आणि विक्री कमी होईल. म्हणून जाहिरात केली जाते. जाहिरात पाहून तुम्हीलगेच दुकानात जाऊन लक्स साबण खरेदी करत नाही. ज्यावेळी गरज असेल तेव्हाच खरेदी करता. पण त्यावेळी इतर साबणांसोबत लक्स ब्रँड ची साबण सुद्धा डोक्यात ठेवता. याला आपण अप्रत्यक्ष परिणाम (Indirect effect) म्हणू शकतो.
आता जेव्हा कंपनीला लक्स साबणाची विक्री वाढवायची असेल तेव्हा ते काय करतात? ते एखादी स्कीम काढतात. पाच साबणांवर दोन साबण फ्री. अशावेळी तुमच्या डोक्यात साबण खरेदी करण्याचे नियोजन असेल तर तुम्ही तात्काळ दुकानात जाऊन तो पाच+दोन साबणाचा बॉक्स खरेदी करताल. याला आपण प्रत्यक्ष परिणाम (Direct effect) म्हणू शकतो. तुमची जाहिरात वाचून ग्राहकांना लगेच ती वस्तू सेवा खरेदी करावीशी वाटेल…

मार्केटमध्ये प्रत्यक्ष परिणाम (direct effect) देणाऱ्या जाहिरातींचे प्रमाण खूप कमी असते. मुख्य भर हा अप्रत्यक्ष परिणाम (indirect effect) करणाऱ्या जाहिरातींवर असतो.

तुम्ही सुद्धा जेव्हा जाहिरात द्याल तेव्हा लगेच रिझल्ट मिळेल अशी अपेक्षा करू नका. जाहिरात करत राहा. तुमचा ब्रँड लोकांच्या डोक्यात आपोआपच घट्ट बसतो. एक जाहिरात दिली आणि काही रिझल्ट आला नाही म्हणून लगेच जाहिरात बंद नसते करायची. तुम्ही लोकांसमोर तुमचा ब्रँड नेत राहायचे असते. तुमच्या जाहिरातीचा परिणाम दिसायला थोडा वेळ लागतोच, तो वेळ देण्याची तयारी ठेवा. तुमच्या दृष्टीने ग्राहक आले नसले तरी प्रत्यक्षात तुम्ही कित्येक लोकांपर्यंत पोचलेला असता… आणि त्यांना सारखी सारखी जाहिरात दिसत राहिली कि ते तुमच्याकडे येणारच असतात. वेळ लागतोच, पण तो तुमच्या दृष्टीने.. प्रत्यक्षात तुमच्या जाहिरातीने तिचे काम सुरु केलेले असते.

असं पहा… चार वर्षांपूर्वी उद्योजक मित्र या व्यासपीठावर एखादी व्यवसायाविषयक माहिती देऊन जर मी थांबलो असतो… तर आज कुणाच्या लक्षातही नसतो. पण उद्योजक मित्र च्या माध्यमातून तुम्हाला काहीतरी चांगले देण्याचा कायम प्रयत्न करत राहिलो म्हणून आज हे व्यासपीठ एका कुटुंबाप्रमाणे मोठे झाले आहे. तुम्ही उद्योजक मित्र ब्रँड ओळखताय, तुमच्या मित्रांनाही उद्योजक मित्र ला जोडण्यासाठी प्रवृत्त करताय, तुमच्या सहभागामुळे आणखीही लोक जोडले जात आहेत… हा indirect effect आहे. उद्योजक मित्र मध्ये व्यावसायिक दृष्टिकोन विशेष नसला तरी लोकांशी जोडले जाण्याचा प्रकार सारखाच आहे… काम करत राहा… विस्तार आपोआप वाढत जातो…

तुमच्या जहिरातीच्या बाबतीतही असंच आहे… जाहिरात करत रहा. कायम लोकांच्या समोर जात राहा… लोकांच्या डोक्यात तुमचा ब्रँड घट्ट बसेल याची काळजी घ्या… आज जाहिरात आणि उद्या रिझल्ट अशी अपेक्षा करू नका… वेळ लागेल रिझल्ट मिळणारच…

(Direct Effect आणि Indirect Effect हे दोनीही शब्द मी तुमच्यासमोर कोणतेही पुस्तकी माहितीमधून मांडले नसून माझ्या वैयक्तिक अभ्यासातून प्रॅक्टिकली मांडले आहेत. त्यामुळे अशा शब्दांची माहिती एखाद्या पुस्तकात मिळण्याची शक्यता कमी आहे… या शब्दांशी मिळते जुळते शब्द वापरून तुम्हाला यासंबंधी अधिक माहिती इंटरनेट वर वा मार्केटिंग यसबंधी पुस्तकांमध्ये मिळू शकते…)

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील

वेबसाईट वर पब्लिश केलेल्या जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार असतात. या जाहिरातींचा 'उद्योजक मित्र'वेबसाईट तसेच उद्योजक मित्रच्या इतर पोर्टलशी कोणताही संबंध नसतो. कोणतेही व्यवहार करताना संपूर्ण शहानिशा करूनच करा.

Related Post

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!