कृषीपूरक उद्योगांना तिकीट शुल्क (फी)ठेऊन मिळवा अधिक नफा


नमस्कार शेतकरी मित्रानो

आज आमच्या मंगल अँग्रो फार्म वर आम्ही तिकीट चालू करून एक वर्ष पूर्ण झाले आणि खूप चांगला प्रतिसाद हि मिळाला आणि मिळत हि आहे. त्याबद्दल चा हा छोटासा लेख लिहत आहे जेणे करून आपणही आपल्या शेतात चालू केलेल्या कृषीपूरक व्यवसायातून अधिक नफा कमवू शकता आणि आपली आणि इतरांचीही प्रगती करण्यात सहभागी होऊ शकता.

एक वर्षापूर्वी जेव्हा मी मंगल अँग्रो फार्म ला तिकीट ठेवायचे ठरवले तेव्हा हि गोष्ट मी घरी बोलून दाखवली तेव्हा घरच्या मंडळीना हे अशक्य वाटले पण जेव्हा त्यांना मी या सर्व गोष्टी समजावून सांगितल्या आणि त्या त्यांना पटल्या आज त्याच आपणा सर्वांन पुढे मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे जेणेकरून आपणही पुढे यातून चांगला आर्थिक नफा कमवू शकता

आपण जेव्हा एखादा उद्योग उभा करतो त्यासाठी सर्वात प्रथम आपण खूप अभ्यास करतो, आपला खूप वेळ,पैसा आणि सर्वात महत्वाची म्हणजे मेहनत लावतो आणि तो उद्योग उभा करतो त्यासाठी आपण आपल्या आयुष्यातील कितीतरी महत्वाची वर्ष खर्च करून आपल्या एक दोन वर्षाची माती करत असतो. तो उधोग उभा करत असतो आणि ते दाखवण्यासाठी आणि माहिती सांगण्यासाठी आपण जर ५० ते १०० रु घेत असू तर त्यात वावगे काय आहे? पण आपल्याकडे एक असा मोठा समज आहे कि शेतकऱ्याचा माल हा सर्वांना फुकटातच पाहिजे तो खाण्यासाठी असू द्यात किवा पाहण्यासाठी बऱ्याच लोकांना असे वाटते कि काय शेतात्तच तर आहे. आणि हीच मानसिकता कुठे तरी बदलली पाहिजेन आणि हीच पद्धत मला आवडत नाही आंपण एखादा सिनेमा पाहतो तिथे आपण तिकीट काढतोच ना? एखाद्या मॉल मध्ये गेल्यावर पार्किंगचे पैसे भरतोच ना मग एखाद्या शेतकऱ्याचा फार्म पाहिल्यावर त्यांना ५० ते १०० रुपये दिल्याने काय असा मोठा फरक पडणार आहे? आपण इतरत्र खूप समाजकार्य करतो हे हि एक समाज कार्य म्हणूनच केले तर नक्कीच एक मानशीक समाधानही मिळेल. आपण एखाद्या शेतकऱ्याचा फार्म पाहून त्याचा आपल्या फार्म उभारणी साठी खूप मोठा फायदा करून घेऊ शकतो बऱ्याच वेळा एखादी गोष्ट ज्यांनी अगोदर एखाद्या व्यवसायाची उभारणी केली आहे त्यांच्या बऱ्याच गोष्टी लक्ष्यात येत नाही कारण त्या अगोदर त्यांनी कुठलाही फार्म प्रत्यक्षात पाहिलेला नसतो किवा त्यावेळी तशी उपलब्धताही नसते, पण जर आपण एखादा फार्म पहिला तर कदाचित आपण ते आपल्या फार्म वर अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो म्हणजेच तो व्यवसाय किवा फार्म हा आपला मार्गदर्शक असतो व ज्यांनी तो व्यवसाय उभा केला आहे ते पण आपले मार्गदर्शक बनू शकतात हे असे अनेक फायदे आपणास एखादा फार्म पाहून होऊ शकतात. किवा त्यातून आपणास नवनवीन कल्पना येतात कमी खर्च करूनही आपले काम होऊ शकते. हे आपण कुठेतरी पाहिल्यावर च आपल्या लक्ष्यात येते आणि मार्गदर्शक फार्म असल्यास पुढे आपणास कधीही अडचण येत नाही जर अश्या गोष्टीन साठी ५० ते १०० रुपये दिल्यास काय मोठे नुकसान आहे.

जर इखाद्या शेतकऱ्याने सुंदर असा गाईंचा गोठा,शेळ्यांचा चांगला प्रकल्प,किवा कुठलाही कृषिपूरक व्यवसाय आपल्या शेतात उभा केला असेल,आणि तेही इतरांपेक्षा काहीतरी वेगळे केले असेल त्याला त्यांनी ठराविक फी ठेऊन नवीन शेतकर्यांना योग्य मार्गदर्शन केल्यास दोघांचाही फायदा होईल आज आपण आमचा फार्म तिकीट पाहून पाहत असेल तर उद्या आपला फार्म कोणीतरी पाहणारच आहे त्यामुळे सुरवात खूप महत्वाची आहे आणि ती कधीही आपल्यापासून झाल्यास अधिक चांगले असे मी समजतो

फार्म ला जर फी असेल तर मोजकेच आणि कामाचेच लोक आपल्या फार्म वर येतील जेणेकरून आपला वेळ फक्त आणि फक्त ज्यांना गरज आहे अश्याच लोकांच्या कामी येईल आमच्या फार्म वर जोपर्यंत आम्ही तिकीट सुरु केले नव्हते तो पर्यंत कुणीही यायचं नंतर नंतर असे व्हायला लागले कि दिवसाला १० ते २० लोकांपर्यंत लोक यायची कारण रस्त्यावर बोर्ड लावलेला त्यामुळे कुणी बाजाराला आले पण वेळ आहे तर चला फार्म पाहून येऊ कुणी लग्नाला आले चला फार्म पाहून येऊ काही काही तर असेही होते कि पाहुणे आलेत मग जेवण व्हायला वेळ आहे कि आले फार्म पाहायला आणि खर फार्म ला तिकीट ठेवायची संकल्पना आली ती येथूनच

आमचा फार्म दाखवायचं म्हणजे किमान अर्धा ते पाऊन तास असाच लागतो आणि एखादा त्यातील दर्दी भेटला कि कधी कधी दोन तासही मग आम्ही दिवसाचा विचार केला तर १० लोक जरी भेटी साठी आले तर आमचा कि मान ५ ते ६ तासाचा वेळ खर्च व्हायचा आणि त्यातून दोघानाही काही फायदा नाही आणि (आणखी एक आम्ही बर्याच फार्म ला भेटी दिल्या पण कोणी पाण्याला पण विचारायचे नाही म्हणून आम्ही एक खास सोय अगोदर पासूनच सुरु केली होती आणि आजही आहे ती म्हणजे कुणीही असो त्यांना चहा पाणी हे आमच्याकडून देतोच भले तिकीट काढू अगर न काढो आणि जी शेतकरी खूप लांबून आली आहेत त्यांची जेवणाची आणि राहण्याची सोय हि आम्ही बीना मोबदला केली आहे कारण ते खास फार्म पाहण्यासाठीच येतात ) गर्दी वाढतच होती आज दिवसाला महत्वाच्या माणसाचेच जर ५ ते ६ तास खर्च झाले म्हणजे पूर्ण दिवसच त्यात जाईचा आणि आपणा सर्वांना तर माहीतच आहे ३०० रु देऊन सुद्धा चांगला माणूस कामाला येत नाही आणि म्हणूनच एक वर्षापूर्वी निर्णय घेतला आणि मागील अक्षय तृतीया पासून फार्म पाहणार्यांसाठी तिकीट चालू केले

तिकीट चालू केल्याचे एवढे फायदे झाले कि बास जेव्हा पासून तिकीट चालू केले तेव्हा पासून आसपासची सर्व मंडळी कमी झाली ज्यांना खरच काही करायचे आहे अश्याच शेतकऱ्यांची गर्दी वाढायायला लागली आम्हालाही अश्या शेतकर्यांना कृषीपूरक व्यवसाया विषयी सांगायला चांगले वाटू लागले सर्वात महत्वाची बाब म्हणजे जेव्हा तुमच्याकडे कुणी शेतकरी फार्म पाहण्यासाठी तिकीट देऊन येईल तो हि त्या विषयात तेवढाच दर्दी असतो आणि मग त्या चर्चेलाही महत्व येते आणि विचारांची देवाघेवानही चांगली होते

आम्ही जे तिकीट चालू केले होते ते फक्त खरा शेतकरी म्हणजे ज्यांना या व्यवसायात काहीतरी कारायचे आहे असेच यावेत यामुळे आम्ही तिकिटामध्ये खूप शिथिलता आणली जसे कि जे शेतकरी आमच्या फार्म वर एकदा येतील त्यांच्याकडून पुन्हा कधीही तिकीट घ्यायचे नाही,आणि आम्ही फक्त ५० रुपये तिकीट ठेवले आहे जेणेकरून सर्व सामान्य लोक सुद्धा फार्म पाहू शकतात. ज्यांनी आमच्या फार्म वरून काही खरेदी केले त्यांच्याकडून तिकीट घ्यायचे नाही आणि ज्यांना तिकीट देऊन फार्म पहायचा नाही त्यांच्या साठी फार्म बाहेरून पाहण्यासाठी फुकट आहे कारण त्यांच्यावर आपल्याला वेळ खर्च करावा लागत नाही

महत्वाची सांगायची गोष्ट म्हणजे आजपर्यंत महाराष्ट्रIतील एक हि जिल्हा असा नाही कि तेथून आजपर्यंत आमच्या फार्म कुणी भेट दिली नाही महाराष्ट्रच नव्हे तर बाहेरील राज्यातील हि बऱ्याच शेतकऱ्यांनी आजपर्यंत फार्म भेटी दिल्या आहेत ते आपणास आमच्या मंगल अँग्रो फार्म च्या फेसबुक पेज वरील मान्यवरांच्या भेटी या आल्बम मध्ये पाहवयास मिळतील आणि जरूर एकदा तरी आमच्या पेज ला भेट द्या

तरी शेतकरी मित्रानो आपण आपल्या पासून एक नवी सुरवात करूयात आपला कुठलाही फार्म असो त्याला ठराविक फी ठेवा भले ती २० रुपये असेल तरी चालेल पण यातून नक्कीच आपणास काहीतरी फायदा होईल आजप्रत्तेक जन फक्त बोलतो शेतकरी उद्योजक झाला पाहीजेन तर आपणही एकमेकांना साह्य करून पुढे जाऊयात

आमच्या मंगल अँग्रो फार्म विषयी अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर जा

https://www.facebook.com/MANGAL-AGRO-FARM-761923987240939/

https://www.youtube.com/c/MangalAgroFarm

https://www.blogger.com/blogger.g?blogID=8719881997459280402#allposts

धन्यवाद
सुरेश गुलगे
मंगल अँग्रो फार्म ८६०५३५३२१२

संकलन उद्योजक मित्र


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!