लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
व्यवसायात जबाबदारींचे / कामांचे जास्तीत जास्त वाटप करणे खुप आवश्यक असते.. सगळीच कामे तुम्ही स्वतः करायला लागलात तर व्यवसायाकडे लक्षच देता येणार नाही. तसेच प्रत्येक कामात स्वतःला गुंतवुन घेतल्यामुळे तुमच्याकडे वेळच शिल्लक रहात नाही आणि यामुळे व्यवसायात आणखी वृद्धींगत करण्याची तुमची ताकद मर्यादीत रहाते… कामात थेट लक्ष देण्यामुळे डोक्यात नवीन विचार तयार होण्याची प्रक्रीया खुंटते. सगळीच कामे स्वतः करत असल्याने तुमची बऱ्याचदा चिडचिड वाढते आणि कामावरील लक्षही कमी होण्याची भिती असते.
आहे त्याच कामासाठी वेळ पुरत नाही त्यात आणखी भार वाढवला किंवा नवीन व्यवसाय सुरु करायचं म्हटलं तर तर काम कोण संभाळणार असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर तुम्हाला आपल्या कामांचे वाटप करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरु करणे आवश्यक आहे… स्वतःवरील कामाचा भार जेवढा कमी करताल तेवढी लवकर प्रगती कराल..
कामांचे, जबाबदारींचे वाटप करणे म्हणजे आपल्या हाताखाली एक चांगली टीम तयार करणे. प्रत्येकाला त्याचेत्याचे काम वाटुन देणे… आणि या टीम वर तुम्ही फक्त लक्ष ठेवायचे काम करणे…..
अशाने तुम्ही कितीही मोठ्या व्यवसायाचा पसारा संभाळु शकतात… कितीही व्यवसायावर लक्ष केंद्रीत करु शकता.. स्वतःसाठी, कुटुंबासाठी वेळ देउ शकता. नवीन व्यवसायांचा, व्यवसाय वृद्धीचा विचार करु शकता.
जबाबदारींचे, कामाचे वाटप ही तुमच्या व्यवसायीक प्रगतीसाठी आवश्यक असलेली सर्वात महत्वाची प्रक्रिया आहे…
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील