देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांना त्यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीकडून यंदा दहाव्या वर्षीही १५ कोटी इतकेच वेतन मिळाले आहे. गेल्या दहा वर्षांपासून अंबानी १५ कोटी इतकेच वेतन घेत असून त्यांच्या वेतनात गेली १० वर्षे काहीही वाढ झालेली नाही. अंबानी यांनी २००८-९ या वर्षापासून आपले वेतन, इतर लाभ, भत्ते आणि कमिशनपोटी १५ कोटी रुपये इतकीच रक्कम कायम ठेवली आहे. तत्पूर्वी त्यांचे वार्षिक वेतन २४ कोटी रुपये इतके होते.
तर, दुसरीकडे ३१ मार्च २०१८ला समाप्त झालेल्या वित्तीय वर्षात अंबानींचे नातेवाईक निखिल आणि हितल यांच्यासह कंपनीचे पूर्णवेळ संचालकांच्या वेतनात चांगली वाढ झाली आहे.
वित्तीय वर्ष २०१७-१८ मध्ये त्यांची मिळकत ४.४९ कोटी होती. यात वेतन आणि भत्त्यांचा समावेश आहे. वर्ष २०१६-१७ मध्ये ही रक्कम ४.१६ कोटी रुपये इतकी होती. तथापि, त्यांचे कमिशन ९. ५३ कोटी रुपये इतके राहिले आहे. तर, इतर सुविधांसाठी देण्यात येणाऱ्या ६० लाख रुपयांच्या रकमेत होत करत ती २७ लाख रुपयांवर आली आहे. सीईओचे वेतन उपयुक्त स्तरावर ठेवण्याबाबत निर्माण झालेल्या वादानंतर अंबानी यांनी स्वेच्छेने ऑक्टोबर २००९ मध्ये आपल्या वेतनाला मर्यादा घातली होती. दुसरीकडे इतर संचालकांच्या वेतनात वृद्धी होत असताना, अंबानी यांनी मात्र आपले वेतन स्थिर ठेवले आहे.
संकलन
उद्योजक मित्र