लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
फुटबॉल जगातील सर्वात जास्त चाहते असणारा खेळ आहे, आपल्याकडे क्रिकेट सर्वात जास्त आवडता खेळ आहे…. काय कारण असेल याचे ? इतर खेळांना या खेळांएवढे चाहते का नसतील मिळत ? कधी विचार केलाय ?
फुटबॉल जगातील सर्वात जास्त आवडता खेळ असण्याचे कारण त्याच्या पद्धतीमध्ये आहे. एखाद्या लहान मुलासमोर तुम्ही एक चेंडू ठेवा. तो काय करेल ? त्याला लाथ मारेल… समोरच्या चेंडूला ला लाथ मारण्याची कला त्याने अगदी लहानपणीच अवगत असते आणि हीच पद्धत त्याला मोठ्यापणी सुद्धा आपलेपणाची वाटते. फुटबॉल खेळण्यासाठी त्याला विशेष कष्टाची गरज पडत नाही. आपल्याकडे क्रिकेट ची अशीच परिस्थिती आहे. लहान मुलाला हातात एक काठी दिली आणि समोर चेंडू ठेवला कि तो त्या काठीने चेंडूला टोलवतो… हि त्याच्यासाठी अगदी सोपी पद्धत खेळण्याची. हीच पद्धत त्याला क्रिकेटचा फॅन बनवते. या खेळांचे एवढे चाहते असण्याचे कारण आहे त्यांच्या साधेपणामधे… simplicity. समोर चेंडू दिसला कि त्याला लाथ मारणे किंवा काठी/बॅट मारणे हि इतकी साधी पद्धत आहे कि मुलं लहानपणीच या खेळांचे चाहते होतात.
लोकांना एखादी गोष्ट जेवढी सोपी वाटते तेवढे ते त्यात गढून जातात. एखादे प्रोडक्ट यशस्वी होण्याचे रहस्य त्याच्या साधेपणामध्ये दडलेले असण्याची शकतात ९०% असते.
काही वर्षांपूर्वी विंडोज ला स्पर्धा म्हणून लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम मार्केटमध्ये आली होती. आजही काही ठिकाणी लिनक्स चा वापर होतो. पण हि ऑपरेटिंग सिस्टीम सामान्य जनतेमध्ये फारशी यशस्वी ठरली नाही.. कारण ? लिनक्स च्या अपयशाचे कारण होत तिच्या अवघड प्रोसेस मध्ये. जगभरात आजही विंडोज सिस्टीमच जास्त वापरली जाते. जगभरातील ८५% ग्राहक आजही फक्त विंडोज OS वापरतात, ते तिच्या सोप्या वापराच्या पद्धतीमुळे. लिनक्स मी सुद्धा कॉलेजमधे असताना वापरण्याचा प्रयत्न केला होता, पण PC सुरु करण्याच्या पद्धतीपासूनच ती सिस्टीम मलाही झेपली नाही. अर्थातच दोन दिवसात लिनक्स ला मी हद्दपार केले, आणि पुन्हा विंडोज वापरायला सुरुवात केली. विंडोज इतकी सोपी ऑपरेटिंग सिस्टीम आहे कि एखादा लहान मुलगाही दोन दिवसात तिचा वापर कसा करायचा हे शिकू शकतो. simplicity हे विंडोज ची खासियत आहे. जगभरातील सगळ्या OS वर कडी करणारे विंडोज म्हणूनच आजही सामान्य ग्राहकांची हक्काची OS आहे…
मोबाईल मधील अँड्रॉइड OS अशाच कारणामुळे लोकांची आवडती झाली. वापरायला सोपी, साधी आणि सरळ… कुठेही गिचमिड नाही, कन्फ्युजन नाही, गोंधळ नाही. अँड्रॉइड च्या तोडीची OS अजूनही मार्केटमध्ये आलेली नाही.
फेसबुक, WhatsApp, इंस्टाग्राम, ट्विटर याच कारणामुळे जगप्रसिद्ध झालेत. या यादीमध्ये लिंक्ड ईन, पिनरेस्ट अजूनही मागे आहेत कारण त्यांची वापरायची अवघड पद्धत.
मारुती-सुझुकी कंपनीच्या गाड्या देशात आजही ७०% शेअर राखून आहेत. याचे कारणही त्यांच्या सोप्या कार्यपद्धतीत आहे. रिपेअरिंग सोपे, सर्व्हिस लगेच मिळते, अशा गुणधर्मामुळे मारुती कंपनी आजही देशात सर्वोत्तम ठरते.
आपण एखादी वस्तू घ्यायला गेलो तर पहिल्या प्रथम ती हाताळायला किती सोपी आहे हेच पाहतो. लोकांना सध्या सरळ सोप्या गोष्टी आवडतात. डोक्याला ताप करून घेण्याची कुणाचीही इच्छा नसते. तुमचे प्रोडक्ट जेवढे सोपे, साधे तेवढे लोकप्रिय हा नियमच झाला आहे मार्केटचा. काही अपवाद असू शकतात, पण अपवाद नियम नसतो…
आजकाल ताज्या पालेभाज्या घरपोच पोचवण्याचा व्यवसाय तेजीत आहे, लोकप्रिय आहे.. पण आता ताज्या पालेभाज्या तुम्हाला जी भाजी करायची आहे त्यासाठी कापून, मसाले टाकून दिल्या जातात, तुम्ही फक्त ती भाजी शिजवून घ्यायची… हे नवीन स्टार्टअप तर येत्या काळात मार्केटमधे धुमाकूळ घालताना दिसू शकते. कारण यात लोकांचा त्रास आणखी कमी झालेला आहे. त्यांचे काम आणखी सोपे झालेले आहे. इन्स्टंट फूड हे प्रकारही यातलाच.
तुम्ही एखादे इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट बनावट असाल तर त्याची लहान सहान दुरुस्ती घरच्याघरी करता येत असेल तर ती ग्राहकांच्या लगेच लोकप्रिय होईल.
तुम्ही एखादे सॉफ्टवेअर बनवले असेल तर ते जेवढे वापरण्यास सोपे तेवढे ग्राहकांना आकर्षित करेल. अगदी कुणी शिकवायला नसले तरी स्वतः आठवडाभर प्रयत्न केले तरी शिकून होईल असे सॉफ्टवेअर असेल तर त्याचा खप इतका वाढेल कि तुमची प्रोडक्शन क्षमता कमी पडेल.
लोकांना तुमचे प्रोडक्ट हाताळायला, वापरायला इतके सोपे आणि सुटसुटीत करा कि त्यांना त्याशिवाय दुसरा पर्यायच शिल्लक राहणार नाही. जेवढे तुमचे प्रोडक्ट सोपे सुटसुटीत असेल तेवढे ते ग्राहकांमधे लवकर लोकप्रिय होते. आणि नुसते लोकप्रियच होत नाही ते तुमचे ग्राहक तुमच्यासाठी स्वतःहून मार्केटिंग करायला लागतात.
थोडक्यात… तुम्हाला तुमचे प्रोडक्ट मार्केटमधे लवकरात लवकर पसरवायचे असेल आणि लोकांच्या फेवरीट लिस्ट मध्ये पाहायचे असेल तर Make It Simple
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील