बाईक राइडर्स अॅक्सेसरीज् शॉप


मागील काही वर्षात तरुणांमध्ये बाईक राईडिंग ची क्रेज वाढत चालली आहे. पाच सात जणांच्या घोळक्याने एखाद्या ट्रिप ला बाईक वर निघणे हा कित्येकांचा छंद झाला आहे. पावसाळ्यात भर पावसात फिरायला निघणे हा आता कित्येकांचा आवडता कार्यक्रम आहे. यासोबतच तरुणांमधे वाहने चालवताना सुरक्षेशी संबंधित साहित्य वापरण्याची जागरूकता सुद्धा वाढत आहे. यामुळेच या रायडर्स ना लागणाऱ्या अॅक्सेसरीज् चे शॉप सुद्धा चांगले चालत आहेत. परंतु हे शॉप शक्यतो मोठ्या शहरातच सापडतात. माध्यम वा लहानलहान शहरात अजूनही असे शॉप टाकण्याचा कुणी विचार केल्याचे दिसत नाही. परंतु सध्याचे मार्केट पाहता या व्यवसायाची भरपूर चलती आहे आणि भविष्यातही राहणार यात शंका नाही.

बाईक राइडर्स अॅक्सेसरीज् मध्ये काय काय वस्तू येतात याचा अंदाज घेणे तसे अवघड नाही. तुम्ही स्वतः रायडींग चे चाटते असाल तर तुम्हाला माहित असेलच. तरीही ढोबळमानाने यात जॅकेट, हेल्मेट, ग्लोव्हज्, बॅग, रेनकोट, शूज, GPS, रिपेअरिंग किट, पंक्चर किट अशा विविध वस्तू या शॉप मधे येतात.

तुमचे शहर ३०-४० हजार लोकवस्तीपेक्षा मोठे असेल तर तुम्हाला स्थानिक स्तरावर हा व्यवसाय सुरु करायला काहीच हरकत नाही.

या सगळ्या अॅक्सेसरीज् तुम्हाला पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरात व्होलसेल मध्ये मिळतील. तसेच थेट उत्पादकांकडून घेण्याचा प्रयत्न केल्यास जास्त फायद्याचे ठरेल. या व्यवसायासाठी शॉप सेटअप, माल पकडता एकूण गुंतवणूक ५-६ लाख किमान लागू शकते.

_

© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!