बांधकाम व्यावसायिक डी.एस.कुलकर्णी आर्थिक घोटाळा प्रकरणात, आपल्या अधिकाराचा गैरवापर करून बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याप्रकरणी, आर्थिक गुन्हे शाखेने बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष व मुख्य व्यवस्थापकीय संचालक रवींद्र मराठे यांच्यासह ६ जणांना बुधवारी अटक केली आहे़.
बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक रवींद्र मराठे, कार्यकारी संचालक राजेंद्र गुप्ता, माजी मुख्य व्यवस्थापकीय संचालक सुशील मुनोत (जयपूर), विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे (अहमदाबाद) तसेच चार्टर्ड अकाउंटंट सुनील घाटपांडे, डीएसके ग्रुपचे इंजिनिअरींग विभागाचे उपाध्यक्ष राजीव नेवसेकर यांचा अटक केलेल्यांमध्ये समावेश आहे़.
डीएसके यांच्या काही कंपन्या केवळ कागदावर अस्तित्वात होत्या़ त्यांची पुरेशी चौकशी न करताच या कंपन्यांना कर्ज देण्यात आल्याचेही तपासात पुढे आले आहे़.
महाराष्ट्र बँकेकडून लवकरच DSK विश्व् मधील मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले आहे.