लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
PNG हा महाराष्ट्रातील जवळजवळ प्रत्येक घराघरात पोहोचलेला ब्रँड आहे. सोने म्हटले कि PNG चा उल्लेख येतोच. उद्योजकांनी आदर्श घ्यावा असा या ब्रँड चा इतिहास आहे. पण हा लेख PNG चा इतिहास सांगण्यासाठी नसून सध्या PNG ची माझ्या नजरेत आलेली एक मस्त जाहिरात स्ट्रॅटेजी सांगण्यासाठी आहे.
माझं ऑफिस नगर आणि पुण्यामध्ये आहे. पुण्यात आठवड्यातून किमान २-३ दिवस मी असतो. थोडक्यात माझी आठवड्यातून किमान १ चक्कर पुण्याला असते. पुण्याला जाताना रस्त्यात सूप, शिरूर, रांजणगाव व आणखी एक दोन ठिकाणी PNG चे बॅनर लागलेले आहेत. मागील वर्षभरापासून या फ्लेक्स बोर्ड वर फक्त PNG च्या जाहिरातीचे बॅनर असतात. हे फ्लेक्स बोर्ड PNG हे कायमस्वरूपीच भाड्याने घेतलेले असावेत. पण जाहिरातीच हे काम फक्त एवढ्यापुरतंच मर्यादित नाही.
माझी पुण्याला सरासरी ४-५ दिवसांनी चक्कर असते आणि या प्रत्येक प्रवासात मला या PNG च्या बोर्ड वर नवीन बॅनर बघायला मिळतो. प्रत्येक वेळी या बॅनर वर एक नवीन फोटो असतो. पण सर्व बॅनरची थीम एकंच असते. मागच्या महिन्यात अधिक मास निमित्त सर्व बॅनर वर चांदीच्या वस्तू होत्या. प्रत्येक बॅनर वर वेगवेगळ्या चांदीच्या वस्तू होत्या. यावेळी सर्व बॅनर वर विटकरी रंगाच्या लहान मटाक्यांवर सोन्याचे हार असलेले फोटो होते. हि थीम आहे. या सर्व बॅनर वर याच थीम मध्ये सुद्धा वेगवेगळे फोटो होते. प्रत्येक फोटोमध्ये भारदस्तपणा आणि कलात्मकता यांचा अनोखा संगम बघायला मिळतो. (यासाठी डिझायनर आणि फोटोग्राफर चे स्किल महत्वाचे). याप्रकारे मागच्या वर्षभरापासून मी प्रत्येकवेळेस या बॅनर वर PNG चे वेगवेगळे फोटो बघितले आहेत. आता तर याची इतकी सवय झाली आहे कि प्रवासाला निघताना आज PNG च्या बॅनर वर काय पाहायला मिळेल याची उत्सुकता असते. बॅनरच्या लोकेशन ला गेलं कि आपसूकच माझी नजर या बॅनर कडे जाते.
PNG ची जाहिरात करण्याची पद्धत अनोखी असल्यामुळे मला तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. हि जाहिरात पद्धत लोकांना त्यांच्या प्रोडक्ट कडे आवर्जून बघायला भाग पडते. यामुळे त्यांचे बॅनर रस्त्यावरील इतर बॅनर मध्ये मिसळून न जात आपले स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करतात आणि लोकांना दाखल घ्याल भाग पडतात. आणि साहजिकच यामुळे PNG चा ब्रँड आपल्याला आणखी भव्य स्वरूपात दिसतो…
ब्रँड लोकांच्या मनात घट्ट बसवण्याची हि पद्धत नवउद्योजकांनी आवर्जून दाखल घ्यावी अशी आहे. PNG ची पद्धत खर्चिक असली तर त्याच प्रकारचे इतरही मार्ग आपल्याकडे असतातच फक्त त्याचा योग्य वापर करणे आवश्यक असते.
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील