लेखक : श्रीकांत आव्हाड
======================
नोकरी करु की व्यवसाय हा प्रश्नच चुकीचा आहे…
नोकरी ईतरांच्या सल्ल्याने करता येईल, पण व्यवसाय करण्यासाठी तुमच्या मनातुनच आवाज आला पाहीजे…
ज्या व्यक्तिला स्वतःच्या करिअरविषयी निर्णय घेता येत नाही, व्यवसाय क्षेत्र अशा व्यक्तिसाठी कधीच योग्य नसते. व्यवसायात सर्वात महत्वाचा गुण लागतो तो म्हणजे निर्णय क्षमता… ज्याच्याकडे निर्णयक्षमता आहे तो यशस्वी व्यवसायिक नक्कीच होऊ शकतो.
यासोबतच आवश्यकता आहे कम्फर्ट झोन मधून बाहेर येण्याची मानसिकता. प्रत्येक बाबीत नकारात्मक विचार करणारे व्यवसायिक बानू शकत नाहीत. सुरक्षितता पाहून व्यवसायाच्या संधी शोधणारे कालांतराने नोकरीकडेच वळतात. कारण व्यवसाय क्षेत्रात कम्फर्ट झोन कधीच नसतो. इथे पावलोपावली रिस्क गृहीत धरूनच वाटचाल करावी लागते.
पर्याय नाही म्हणुन व्यवसाय करणारे आपल्याकडे भरपुर आहेत, पण त्यांची पोहोच एखाद्या छोट्या व्यवसायापलीकडे कधीच जात नाही कारण व्यवसाय करण्याची त्यांची मनातुन ईच्छा कधीच नसते… फक्त एक दररोजच्या कमाईचे साधन एवढ्यापुरतेच ते व्यवसायाकडे पाहतात… व्यवसायाची नशा असणाऱ्यांसाठी व्यवसाय हा आर्थीक उत्पन्नापेक्षाही खुप काही असतो. अशांसाठी व्यवसाय हे करिअर नसते तर आयुष्य असते.
व्यवसाय ही मनातुन येणारी उर्जा आहे, कुणी सांगीतलं म्हणुन व्यवसाय होउ शकत नाही.
व्यवसाय ठरवुन होत नाही… तुम्ही आपोआपच त्याकडे ओढले जाता…
नोकरी करु की व्यवसाय हा प्रश्न गैरलागू आहे…
यापेक्षा व्यवसाय कसा करु हा प्रश्न ठीक आहे. ईथे तुम्ही स्वतः निर्णय घेउन व्यवसायाची पहीली पायरी पार केलेली आहे..
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_
© श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९० (WhatsApp Only)
Business Consultant
www.ShrikantAvhad.com
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील
खुप मस्त लेख आहे सर।