जिव्हारी लागलेला अपमान, जगाला “लॅम्बोर्गिनी” सारखी सुपरकार देऊन गेला


लॅम्बोर्गिनी फाऊंडर फेरुसिओ लॅम्बोर्गिनी हे सुरुवातीला ट्रॅक्टर व्यवसायिक होते.

दुसऱ्या महायुद्धांनंतर त्यांनी महायुद्धात वापरलेली मिलिटरी मशीन घेऊन त्यांचे ट्रॅक्टर मध्ये रूपांतर करण्याचा व्यवसाय सुरु केला. व्यवसाय चांगला चालायला लागला, लॅम्बोर्गिनी यांचेकडे चांगली संपत्ती जमा व्हायला लागली.

लॅम्बोर्गिनी यांना सुपर कार्स चालवण्याचा छंद होता. त्यांचेकडे बऱ्याचशा सुपर कार्स होत्या, यातील एक होती फेरारी. फेरारी चालवताना त्यांना गाडीमध्ये काही दोष आढळले. आवाज जास्त असणे, रस्त्यावर थोडी रफ ड्राइव्ह असणे आणि क्लच सारखा सारखा दुरुस्त करावा लगे अशा काही समस्या त्यांना दिसल्या. यासंबंधी त्यांनी कंपनीकडे त्यांच्या सूचना (Suggestionस) पाठवले.

एन्झो फेरारी हे फेरारी कंपनीचे मालक. यावेळी सुपर कार्स च्या दुनियेत फेरारी यांचा दबदबा होता. ते स्वतः सुद्धा चांगले मेकॅनिक होते. लॅम्बोर्गिनी यांच्या सूचना त्यांना काही पसंत पडल्या नाहीत. एका ट्रॅक्टर मेकॅनिक ने आम्हाला सुपर कार कशी बनवायची हे शिकवू नये अशा शब्दात त्यांनी लॅम्बोर्गिनी यांच्या सूचना धुडकावून लावल्या.

लॅम्बोर्गिनी यांना फेरारीचे वागणे चांगलेच खटकले. आणि त्यांनी स्वतःच सुपर कार ची निर्मिती करण्याचे ठरवले, आणि त्यावर तात्काळ काम सुरूही केले.

अतिशय कमी कालावधीत त्यांनी Lamborghini 350GTV या नावाने आपली पहिली सुपर कार १९६३ मधे “तुरिन मोटार शो” मध्ये लॉन्च केली. आणि १९६४ पर्यंत त्यांनी १३ कार विकल्या. याच काळात त्यांनी Automobili Ferruccio Lamborghini नावाने कंपनी स्थापन केली आणि आपल्या सुपर कार्स चे कमर्शियल स्तरावर उत्पाद सुरु केले.

एन्झो फेरारींनी केलेला अपमान म्हणा किंवा एका ट्रॅक्टर बनवणाऱ्याला मारलेला टोमणा म्हणा, पण यामुळे जगाला एक अद्वितीय अशी सुपरकार मिळाली

_

उद्योजक मित्र
www.udyojakmitra.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


One thought on “जिव्हारी लागलेला अपमान, जगाला “लॅम्बोर्गिनी” सारखी सुपरकार देऊन गेला

  1. या व्यक्ती विषयी आम्हाला अजून माहिती हवी आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!