मागील कित्येक महिन्यांपासून कोणताही व्यवहार न करणाऱ्या कंपन्यांविरोधात सेबीने (भांडवल बाजार नियंत्रक) आक्रमक पाऊल उचलले आहे. मुंबई शेअर बाजारातील अशा प्रकारच्या २२२ कंपन्यांची व्यवहार मान्यता रद्द करण्यात येणार आहे.
मागील सहा महिन्यांपासून या कंपन्यांच्या समभागांत (शेअर्समधे) कोणत्याही प्रकारची खरेदी-विक्री झालेली नाही. या कंपन्या बनावट असल्याचा सेबीला संशय असून बेकायदा मार्गाने कमवलेले पैसे त्यात गुंतविले गेले असल्याची शक्यता आहे. यामुळेच अशा प्रकारच्या सूचिबद्ध अथवा सूचिबद्ध नसलेल्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय सेबीने घेतला आहे. सेबीने या वर्षी मे महिन्यात २०० कंपन्यांवर तर, गेल्या वर्षी ऑगस्टमध्येही तीनशे पेक्षा जास्त संशयित कंपन्यांवर कारवाई करण्याच्या सूचना काही स्टॉक एक्स्चेंजना दिल्या होत्या.