डोनाल्ड ट्रम्प :: दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरून यशस्वी उड्डाण घेणाऱ्या उद्योजकाची कहाणी


अमेरिकेचे राष्ट्रपती “डोनाल्ड ट्रम्प” हे जगप्रसिद्ध रिअल इस्टेट व्यवसायिक आहेत. अमेरिकेत व अमेरिकेबाहेरही त्यांचा या क्षेत्रातील दबदबा कायम आहे. आज ते अमेरिकेचे राष्ट्रपती आहेत. अर्थसाक्षरतेवरील त्यांची पुस्तके आवर्जून वाचावीत अशी आहेत. ट्रम्प यांच्याकडे अब्जावधींची संपत्ती आहे, आणि ती दिवसेंदिवस वाढतच आहे. पण हेच डोनाल्ड ट्रम्प काही वर्षांपूर्वी दिवाळखोरीत निघण्याच्या वाटेवर होते हे संगितलं तर कुणाला पाटणाराही नाही… पण त्यांची या आर्थिक अरिष्टातून बाहेर येण्याची जिद्द पहिली तर या व्यक्तीबद्दलचा आदर आणखी वाढल्याशिवाय राहणार नाही. ट्रम्प यांच्या आयुष्यातील पडद्याआड असलेला अपयशातून उभारणीचा असाच एक किस्सा पाहुयात.

डोनाल्ड ट्रम्प यांचा रियाल इस्टेट चा व्यवसाय हा परंपरेने आला होता. वडिलांचा व्यवसाय सांभाळायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी त्यात भरपूर वाढ केली, गडगंज संपत्ती जमा केली, अमेरिकेतील प्रतिष्ठित व अब्जाधीश उद्योजकांच्या यादीत गणले जाऊ लागले. पण काही कारणांनी व्यवसायाचे आर्थिक दुष्टचक्र सुरु झाले आणि आणि ट्रम्प दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आले. भवितव्य अंधारात दिसत होते. व्यवसायिक आयुष्य उध्वस्त होण्याच्या मार्गावर होते.

याच निराशेत एक दिवस त्यांनी न्यूयॉर्क येथील त्यांच्या कार्यालयात सर्व कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले, आणि आपल्या व्यवसायाचे भवितव्य काहीच उरलेले नाही हे स्पष्टपणे सांगितले. त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना सध्याच्या परिस्थिती बद्दल माहिती दिली आणि आपण लवकरच दिवाळखोरीत निघणार आहोत, अर्थातच तुमचा पगारही देणे आता मला शक्य नाही असे सांगून सर्वांना हि नोकरी सोडून नवीन नोकरी शोधावी असे निर्देशही दिले. प्रत्येकाला आपापले राजीनामे आठवड्याच्या आत जमा करायला सांगितले आणि तशाच उद्विग्न अवस्थेत ते कार्यालयाच्या बाहेर आले. त्यांच्या कार च्या ड्रायव्हर ने त्यांच्यासाठी कार चा दरवाजा उघडला, पण ट्रम्प यांना काय वाटले माही नाही, त्यांनी गाडीत न बसता पायी चालण्याचा निर्णय घेतला. ड्रायव्हर ला पुढील दोन सिग्नल सोडून रस्त्याच्या कडेला थांबायला सांगितले.

रस्त्याने चालत चालत ते एका चौकात आले. त्यांना समोर एक गाणे गाणारा मुलगा दिसला. त्याच्या समोर एक झोळी होती आणि हातात गिटार घेऊन तो गाणे गात होता. रस्त्याने येणारे जाणारे त्याच्या समोर काही पेन्स (पैसे) टाकून पुढे जात. ट्रम्प तिथेच त्याच्या शेजारी बसले, तासभर त्याच्याकडे एकटक पाहत होते. ट्रम्प यांना पाहून तिथली गर्दी आणखी वाढत होती. तासाभराने त्यांनी त्या गायकाशी चर्चा करायला सुरुवात केली. दिवसाला किती कमावतो, महिन्याला किती पैसे मिळतात असे काही प्रश्न त्यांनी विचारले. गायकाने दिवसाला १० डॉलर च्या आसपास आणि महिन्याला २००-३०० डॉलर मिळतात असे सांगितले.

ट्रम्प यांना त्यावेळी बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. जर हा मुलगा महिन्याला दोनशे डॉलर कमावण्यासाठी दिवसभर मेहनत करत असेल, १००% आउटपुट देत असेल तर आपण आजही हजारो कोटींच्या साम्राज्याचे मालक आहोत आपण माघार घेण्याची गरजच काय आहे ? आपल्याकडे तर आजही कितीतरी संपत्ती शिल्लक आहे त्याचा योग्य वापर करून आपण पुन्हा उभारी घेऊ शकतो…

ट्रम्प पुन्हा माघारी फिरले… ड्रायव्हर ला कार्यालयातच बोलावले. काही वेळातच ते आपल्या कार्यालयात गेले सर्व कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले आणि सांगितले कि मघाशी सांगितलेलं भाषण विसरून जा… कुणीही आपले राजीनामे द्यायची गरज नाही. जर रस्त्यावरचा एखादा व्यक्ती महिन्याला दोनशे डॉलर कमावण्यासाठी आपले १००% देत असेल तर आपण का नाही ? आपल्याकडे तर सर्व स्रोत उपलब्ध आहेत. आज आत्तापासूनच कामाला लागा. जे आहे त्यात काय करता येईल हे मी पाहतो. तुम्ही कुठेही जायची गरज नाही. आपल्याला माघार घेण्याची गरज नाही…

यानंतर ट्रम्प यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेत पुढच्या तीन चार वर्षातच आपली सगळी देणी फेडून पुन्हा नव्याने व्यवसायाला सुरुवात केली. पुढचा इतिहास आपल्या समोर आहेच… आणि आज तर ते अमेरिकेचे अध्यक्ष आहेत…

एखाद्या संकटाने खचून जाणे, माघार घेणे सोपे असते पण त्यातूनही पुन्हा उभारी घेणारे खरे जगज्जेते असतात…

खंबीर व्हा…
उद्योजक व्हा…

_

उद्योजक मित्र

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!