ज्या कंपनीने नोकरी नाकारली त्याच कंपनीला आपले स्टार्ट अप १९ अब्ज डॉलर्स ला विकले


त्याला ट्विटर ने नोकरी नाकारली
त्याला फेसबुक ने नोकरी नाकारली
पाच वर्षांनी त्याने आपली WhatsApp कंपनी फेसबुक ला १९ अब्ज डॉलर्स ला विकली…

ब्रायन अॅक्टन… WhatsApp चा सहसंस्थापक

याहू, अॅपल सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम केलेल्या ब्रायन यांना २००९ मध्ये ट्विटर आणि फेसबुक दोनीही ठिकाणी निराशाच हाती लागली होती. पण यशस्वी होण्यासाठी कोणत्याही परिस्थिती तुमच्यात नेहमी जी सकारात्मक ऊर्जा असणे आवश्यक असते ब्रायन मधे ठासून भरलेली होती. ट्विटर ने नाकारल्यानंतरही ते निराश झाले नाही. फेसबुक ने नाकारल्यानंतरही त्यांनी मनाला लावून घेतले नाही. इतर ठिकाणी सुद्धा त्यांना असाच अनुभव आला. या सगळ्या उठाठेवींना कंटाळून त्यांनी नोकरीपेक्षा एखादे स्टार्टअप सुरु करण्याचा विचार सुरु केला. आणि त्याच वर्षी म्हणजे २००९ मध्ये त्याने आपला युक्रेन चा सहकारी जॉन कोम याच्यासोबत WhatsApp अॅप्लिकेशन वर काम सुरु केले आणि ते लाँच सुद्धा केले. अल्पावधीत WhatsApp तुफान लोकप्रिय झाले. दोन तीन वर्षात हे अॅप्लिकेशन जगभर लोकप्रिय झाले.

२०१४ मध्ये फेसबुक ने WhatsApp खरेदी करण्यासाठी ऑफर दिली. हि ऑफर होती १९ अब्ज डॉलर्स ची. दोघांच्या भागीदारीत ब्रायन चा हिस्सा २०% होता. हि डील जगभरातील व्यापारविश्वात गाजली. एका अॅप्लिकेशन साठी एवढी किंमत व्यापारविश्वासाठी आणि सामान्य नागरिकांसाठी सुद्धा धक्कादायक होती.

या डील नंतर जगभरात सर्व्हिस इंडस्ट्री ची आणि इंनटरनेट च्या ताकदीची खरी ओळख झाली असे म्हणायला हरकत नाही. एक चांगली संकल्पना तुम्हाला अपलावधीत अब्जाधीशांच्या रांगेत बसवू शकते हे नवउद्यजकांच्या लक्षात आले आणि जगातील तमाम उद्योजक आपल्या नवनवीन संकल्पनांवर काम करायला लागले.

फक्त पाच वर्षांचा काळ तुमचे आयुष्य बदलवू शकतो.
थोडक्यात… आज आपण कुठे आहोत यापेक्षा आज आपण काय करतोय याला महत्व आहे.

नवनवीन संकल्पना अमलात आणा. पैसा किती मिळेल यापेक्षा आपण जे करतोय त्यात Potential किती आहे याचा विचार करा. आपल्या कामात जास्तीत जास्त पारंगत होण्याचा प्रयत्न करा. वेळ द्या… संयम बाळगा… काम करत राहा… तुमचा व्यवसाय तुम्हाला कधीही निराश करणार नाही.

उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

उद्योजक मित्र

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!