जगभरातील आलिशान वाहनांच्या मार्केटीमधे आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या टाटा मोटर्स अंकित जग्वार लँड रोव्हर ने जून महिन्यात जगभरात ८७७७० वाहनांची विक्री केली असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. कंपनीने जून महिन्यात ५२०४९ जग्वार कार्स ची विक्री केलेली आहे तर ३५७२१ लँड रोव्हर वाहनांची विक्री केलेली आहे. लँड रोव्हर च्या विक्रीमध्ये १.५% घट झालेली आहे. याचे कारण चीन ने वाढवलेली इम्पोर्ट ड्युटी असल्याचे सांगितले जात आहे. तरीही US, UK मध्ये जास्त विक्री झाल्यामुळे याचा एकूण विक्रीवर जास्त परिणाम झालेला नसल्याचे कंपनीने सांगितले.
दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या JLR ला टाटा मोटर्स ने विकत घेतल्यापासून या कंपनीमध्ये सातत्याने प्रगती होत आहे. कंपनीने आपला जगभरातील आलिशान कार्स च्या मार्केटमधील दबदबा कायम ठेवण्यात याहस मिळविले आहे.