फेसबुक च्या शेअर मध्ये २.४% वाढ झाल्यामुळे फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झुकरबर्ग जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे यांना मागे टाकून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत तिसऱ्या स्थानी आले आहेत.
‘ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्स’ने ही यादी प्रसिद्ध केली असून या यादीनुसार, झुकरबर्ग आता श्रीमंत व्यक्तीच्या यादीत तिसऱ्यास्थानी आहे. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स हे दोघे मार्क झुकरबर्गच्या पुढे आहेत. फेसबुकच्या शेअरमध्ये २.४ टक्के वाढ झाल्याने झुकरबर्गच्या संपत्तीत वाढ झाली आहे. त्यामुळे झुकरबर्गची संपत्ती आता ८१.६ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे.
गुंतवणूकदारांनी फेसबुकवर विश्वास दाखवल्याने झुकरबर्ग यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. दरम्यान, यावर्षी फेसबुकला डेटा लिक केल्याच्या आरोपाचा सामना करावा लागला होता. यामुळे काही काळासाठी कंपनीचे शेअर्स घसरले होते, परंतु सर्व काही स्थिरस्थावर झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी पुन्हा कंपनीवर विश्वास दाखवला आहे.