सुमारे ३५ एकर मध्ये पसरलेल्या सॅमसंग च्या जगातील सर्वात मोठ्या मोबाईल कंपनीचे उदघाटन नरेंद्र मोदी व दक्षिण कोरिया चे अध्यक्ष मुन जे-ईन यांच्या हस्ते पार पडले.
या कंपनीतून वर्षाला सुमारे १२ कोटी मोबाईल्स ची निर्मिती केली जाणार आहे. तसेच या प्लॅंट मुळे किमान ५००० नवीन रोजगार निर्माण होण्याचा अंदाज आहे.
उत्तर प्रदेश मधील नोएडा येथे सेक्टर ८१ मध्ये कंपनीचे स्थित आहे. कंपनीच्या सध्या चालू असलेल्या युनिट मध्ये आणखी मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात अली आहे. कंपनीची सध्याची क्षमता वर्षाला ६.७ कोटी मोबाईल निर्मितीची आहे, यामध्ये आता जवळ जवळ दुप्पट वाढ होणार आहे. यामुळे कंपनी जगातील सर्वात मोठी मोबाईल उत्पादक कंपनी ठरणार आहे.