व्यवसाय संधी :: हँडक्राफ्ट प्रोडक्ट्स


हँडमेड वस्तुंना बाजारात चांगली मागणी असते. पर्स, वाॅलेट, शोभेच्या वस्तु, भेटीच्या वस्तु, शुभेच्छा पत्रके (greetings), सौंदर्य प्रसाधने, बांबुच्या वस्तु, लाकडी शोभेच्या वस्तु, कोरीव काम, वारली पेंटींग, फ्लावर पाॅट ई. प्रकारच्या हँडमेड प्रोडक्ट्स ना मार्केटमधे चांगली मागणी आहे… जे जे तुम्ही हाताने बनवू शकता ते ते सर्व काही या कॅटॅगरीमध्ये येते.

तुम्ही हस्तकलेसंबंधी एखाद्या कलेत पारंगत असाल तर त्याच्याशी निगडीत व्यवसाय सुरु करा, किंवा एखादे चांगले प्रोडक्ट निवडुन त्यासंबंधी प्रशिक्षण घ्या….

हस्तकला व्यवसायासाठी गुंतवणुक अतिशय कमी लागते. कारण यात मशिनरीची गरज नसते व कच्चा माल सुद्धा आवश्यकतेनुसार घेता येतो, फक्त हातात कला असणे हीच या व्यवसायाची मोठी गुंतवणुक आहे…

या व्यवसायात कलात्मक मार्केटींग ला महत्व आहे. ग्राहकांना आकर्षीत करणाऱ्या कलात्मक मार्केटींग च्या आधारे तुम्ही चांगला व्यवसाय ऊभारु शकता….

महीलांसाठी हा व्यवसाय विशेष चांगला आहे.

विक्रीसाठी स्थानिक बाजारपेठ, परिसरातील मोठी शहरे, मॉल, ऑनलाईन शॉपिंग साईट्स यासारखे विविध पर्याय आहेत.
तसेच जास्तीत जास्त व्यवसायिकांनी एकत्र येऊन सुरुवात केली तर हॅन्डक्राफ्ट्स ची चांगली रेंज तयार होईल यामुळे मार्केट सुद्धा चांगले मिळू शकेल.

_

उद्योजक मित्र

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.


One thought on “व्यवसाय संधी :: हँडक्राफ्ट प्रोडक्ट्स

  1. Hi,
    I have herbal cosmetics business which products are made by me. But I don’t understand how to grow my business. Now I registered my business and I sell my product out of India also. But in only 2-3 times. If you have any suggestions please let me know.
    Thanks.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!