IT Return चे व्यवसायातील महत्व …


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

IT Return हि संकल्पना तशी देशातील फक्त ५% वर्गापुरती मर्यादित आहे. IT Return म्हणजे काय हे इतरांच्या गावीही नाहीये. जवळजवळ सर्वांचा समज असा आहे कि मी टॅक्स भरत असेल तरच IT Return फाईल करणे आवश्यक आहे. पण असे नाही…. IT Return म्हणजे तुमच्या उत्पन्नाचा ताळेबंद असतो. त्याचा तुमच्या टॅक्स शी संबंध नाही.

कर न भरणाऱ्यांना (व्यवसायिक अथवा नोकरदार) IT Return सक्तीचा नसला तरी तो आपल्या व्यवसायासाठी खूप महत्वाचा आहे हे आपल्या लक्षातच येत नाही.

थोडक्यात तुम्ही नोकरी करताय किंवा तुमचा एखादा छोटासा व्यवसाय आहे. वर्षाकाठी तुम्ही २ लाखाचं उत्पन्न मिळवताय. हे उत्पन्न करपात्र नाही, म्हणजे तुम्ही IT Return फाईल करणे आवश्यक नाही, पण तेच जर तुम्ही निल (म्हणजे कर भरण्यास पात्र नाही) म्हणून Return फाईल केला तर तुमचा त्या वर्षीचा अधिकृत उत्पन्नाचा पुरावा तुमच्या हाती येतो. कुणी तुमच्या मागील वर्षाच्या उत्पन्नाचा पुरावा मागितला तर तुम्ही फक्त IT Return दाखवायचा… तुमचे उत्पन्न स्पष्ट होते.

आता हा IT Return व्यवसायासाठी कसा उपयुक्त आहे हे पाहू.

व्यवसायिकांसाठी :- तुमचा एखादा व्यवसाय आहे, मागच्या १०-१२ वर्षांपासून चालू आहे. तुम्ही पुरेसे उत्पन्न मिळवताय. पण ते करपात्र नसल्यामुळे तुम्ही आजपर्यंत कधीही IT Return फाईल केलेलाच नाही. आता तुम्हाला व्यवसाय वाढीसाठी कर्ज हवंय, अशा वेळेस तुम्ही बँकेत जाता, त्यांना व्यवसाय वाढीसाठी कर्ज मागता, यात मुद्रा किंवा व्यवसाय कर्ज कोणतेही कर्ज येते, आणि बँक तुम्हाला मागच्या तीन वर्षांचा IT Return दाखवा म्हणते… ते तुमच्याकडे नसते. बँक कर्ज नाकारते. तुम्ही सांगता १०-१२ वर्षांपासून व्यवसाय आहे, वर्षाला २ लाख रुपये कमावतोय, पण बँक IT Return मागते. ते तुमच्याकडे नसते, साहजिकच कर्ज मिळत नाही. आता अशावेळेस बँक कर्ज देत नाही अशी तक्रार करून काय फायदा जर तुम्ही त्यांच्या प्राथमिक कागदपत्रांची पूर्तता करू शकत नाही… यात बँकेचाही दोष नाही. तुम्ही खरंच किती उत्पन्न कमावताय हे बँकेला अधिकृतरीत्या दाखविणे आवश्यक असते, तुमच्या तोंडी माहितीवर ते विश्वास ठेवत नाही. तुम्ही किती कमावता हे जोपर्यंत बँकेला माहित होत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांच्या कर्जाचा परतावा करण्यासाठी सक्षम आहेत कि नाही हे कसे कळणार ?

तुम्हाला नवीन व्यवसाय करायचाय :- तुम्हाला एखादे दुकान (उदा किराणा, कपड्यांचे दुकान ई.) सुरु करायचे आहे. यासाठी कर्ज हवे आहे. अशावेळी मुद्रा कर्ज हा एकच पर्याय आहे. पण जर तुमच्याकडे मागच्या तीन वर्षाचा IT Return नसेल तर बँक तुम्हाला जास्तीत जास्त ५० हजार कर्ज मंजूर करते. यात तुमचा व्यवसाय सुरु होऊ शकत नसेल तर तुमचा हिरमोड होतो. तेच जर तुम्ही IT Return देऊ शकलात तर १० लाखांपर्यंत कर्ज मंजूर होऊ शकते. कारण तुम्ही काहीतरी उत्पन्न कमवत आहात याचा पुरावा तुम्ही बँकेला दिलेला असतो, म्हणजे आर्थिक दृष्ट्या साक्षर असता आणि अशावेळेस तुम्ही दिलेल्या कर्जाचा योग्य उपयोग करू शकता याची बँकेला खात्री पटते.

तुमचा व्यवसाय तीन चार वर्षांपासून चांगला चालू असेल आणि तुम्ही किमान तीन वर्षांचे IT रिटर्न फाईल केलेले असतील तर तुम्हाला व्यवसाय वृद्धीसाठी कर्ज देण्यासाठी बँका दारात रांगा लावून उभ्या राहतील…

फक्त नवीन प्रोजेक्ट ,मॅन्युफॅक्चरिंग किंवा सर्व्हिस, सुरु करण्यासाठी IT Return ची गरज नसते.

IT रिटर्न फक्त कर भरण्यासाठी असतो असे नसून तुम्ही वर्षभरात काय कमावलंय, किती खर्च केलाय, शिल्लक किती, गुंतवणूक किती अशा सर्व आर्थिक बाबींचा ताळेबंद असतो. आता मागील वर्षीचे रिटर्न भरण्याच्या संधी नाही, फक्त चालू वर्षीचा रिटर्न भरू शकता. ३१ जुलै पर्यंत रिटर्न भरण्याची मुदत असते. त्यानुसार आत्तापासूनच आपल्या CA ला सांगून कागदपत्रांची जमावाजमव करून लवकरात लवकर रिटर्न भरण्याची तयारी करा

व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाने IT रिटर्न भरायलाच हवा. व्यवसाय करण्याची हि पहिली अट समजावी.

काय करावं ?

जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर IT Return फाईल करायला सुरुवात करा. अगदी तुमचं वय १८-१९ असलं तरी. तुमच उत्पन्न करपात्र उत्पन्न नसेल तर निल रिटर्न फाईल करा. यासाठी तुम्ही https://incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईट वर जाऊन स्वतः रिटर्न फाईल करू शकता, किंवा टॅक्स कन्सल्टन्ट व CA ची मदत घेऊ शकता.

उत्पन्न कमी असेल तर निल रिटर्न फाईल करा, पण फाईल कराच… आणि जर तुम्ही थोडाफार कर भरला तर Financial Image Building साठी आणखीच फायदा होईल.

IT Return हा तुमच्या आर्थिक साक्षरतेचा आणि सक्षमतेचा पुरावा आहे. तो असेल तर तुम्हाला व्यवसायात अडचणी येत नाही. तुमच्या व्यवसायासाठी किंवा सुरु करावयाच्या व्यवसायासाठी IT Return खूप महत्वाचा आहे.

IT Return फाईल करा…
व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…

_

श्रीकांत आव्हाड

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

5 thoughts on “IT Return चे व्यवसायातील महत्व …

  1. सर मला पण व्यवसाय करायचा आहे पण माझी आय टी रिटन नाही मला बँक लोन देते नाही थोडी माहीती द्या.

    1. तुमच्या व्यवसायाचा आणि रिटर्न चा संबंध नसतो. IT रिटर्न हा फक्त तुम्ही वर्षभरात किती कमावताय याचा ताळेबंद असतो. व्यवसाय सुरु केला म्हणून रिटर्न फाईल केलाच पाहिजे अशी सक्ती नसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!