सरकारने GST करांमध्ये सुसूत्रता आणताना १०० पेक्षा जास्त वास्तू कमी दार टप्प्यात आणल्या. या निर्णयामुळे या वस्तूंच्या किमती कमी होण्याची अशा निर्माण झाली. निश्चलीकरन आणि त्यांनतर लगेच GST ची अंमलबजावणी यामुळे सलग दोन वर्षांपासून मंदीच्या छायेत असणाऱ्या रिटेल मार्केटमधे उत्साह निर्माण झाला आहे. विक्री वाढण्याच्या शक्यतेमुळे उत्पादकांमध्येही उत्साह निर्माण झाला आहे. याचा परिणाम अप्रत्यक्षपणे रोजगार वाढण्यावरही होणार आहेच.
नवीन बदलानंतर आता सर्वोच्च दाराच्या टप्प्यात फक्त ३५ वस्तू शिल्क्लक आहेत. या सर्व वस्तू चैनेच्या प्रकारात येतात. जीवनावश्यक वस्तूंमध्ये झालेल्या करकपातीमुळे सामान्य नागरिकांनाही महागाईतून थोडा दिलासा मिळेल.
वर्षभरापूर्वी जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाली तेव्हा २८% या सर्वोच्च स्तराच्या कक्षेत तब्बल २२६ वस्तू होत्या. यातील १९१ वस्तू टप्प्याटप्प्याने यातून बाहेर पडल्या आहेत. आता फक्त ३५ वस्तू शिल्लक आहेत. कालांतराने या उर्वरित ३५ वस्तूंतील आणखी काही वस्तूही या सूचीतून बाद होतील, अशी शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तंबाखू, सिगारेट, पानमसाला आदी वस्तूच केवळ २८ टक्क्यांच्या कक्षेत उरतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.