Idea Vodafone ने विलीनीकरणासाठी भरला रु. ७२६८ कोटी चा कर


Idea आणि Vodafone या देशातील दोन मोठ्या टेलिकॉम कंपन्यांच्या विलीनीकरणाच्या परवानगीसाठी डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन (DoT) ने निर्धारित केलेला रु. ७२६८ कर या दोन कंपन्यांनी ने भरला आहे. यामुळे आता लवकरच या दोन मोठ्या कंपन्यांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होण्याचा अंदाज आहे. हि रक्कम भारण्याला होणार उशीर विलीनीकरणाला कारणीभूत ठरत होता. आता या विलीनीकरणातील मख्य अडथळा दूर झाल्याने लवकरच विलीनीकरीण होऊन Idea हि देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी ठरणार आहे.

या रकमेपैकी काही रक्कम रोख स्वरूपात तर काही बँक गॅरंटी च्या स्वरूपात भरले असल्याची माहिती Idea च्या प्रतिनिधींनी दिली. आम्ही या व्यवहारासाठी आता लवकरच DoT ची परवानगी मिळेल अशी अशा बाळगून आहोत असेही प्रतिनिधींनी सांगितले.


2 thoughts on “Idea Vodafone ने विलीनीकरणासाठी भरला रु. ७२६८ कोटी चा कर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!