धक्कादायक : अमेरिकेच्या एकाच पेटंट फर्म चे भारतातील १८० पेक्षा जास्त महत्वाच्या संस्थांपेक्षा दुप्पट पेटंट अर्ज.


सन २०१६-२०१७ मध्ये एका अमेरिकन फार्म दाखल केलेल्या पेटंट अर्जाची संख्या, DRDO च्या ५० लॅब, IISc च्या ४० पेक्षा जास्त लॅब, CSIR अंतर्गत येणाऱ्या ३८ लॅब, ३१ NIT, २३ IIT आणि ISRO च्या सहा महत्वाच्या रिसर्च फॅसिलिटी यांच्या एकत्रित संख्येपेक्षा दुपटीपेक्षा (१३५%+) जास्त आहेत. या सर्व संस्थांनी मिळून २०१६-२०१७ या वर्षात ७८१ पेटंट अर्ज दाखल केलेत तर याच काळात Qualcom Inc. या अमेरिकन semiconductor & telecom equipment कंपनीने एकट्याने १८४० अर्ज दाखल केले असल्याची माहिती कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट, डिझाईन & ट्रेड मार्क यांनी दिली आहे.

देशात एकूण दाखल झालेल्या पेटंट अर्जांपैकी भारतीयांचा वाट फक्त २९% आहे. देशात २०१६-२०१७ मधे ४५,४४४ पेटंट अर्ज दाखल झाले, यापैकी ७१% परदेशी अर्जदार (गुंतवणूकदार व अर्जदार) आहेत तर फक्त २९% भारतीय अर्जदार आहेत. अमेरिका जपान आणि चीन यांनी एकत्रितपणे सर्व भारतीय वैज्ञानिक, संशोधन आणि व्यवसायिक संस्थांपेक्षा जास्त पेटंट अर्ज दाखल केले आहेत.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!