विजय माल्याला ब्रिटिश न्यायालयाचा दणका


भारतीय बँकांना मिळाली १.१४ अब्ज पौंड किमतीच्या लंडनस्थित मालमत्ता जप्त करण्याची परवानगी

भारतातील विविध बँकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशी पलायन केलेल्या विजय मल्ल्या याला बुधवारी ब्रिटिश न्यायालयाने आणखी एक दणका दिला. मल्ल्या व त्याच्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या मालमत्ता जप्त करण्यासंदर्भातील याचिकेवरील सुनावणीमध्ये येथील उच्च न्यायालयाने भारतीय बँकांच्या बाजूने निकाल दिला होता. या निकालास मल्ल्याने अपीलीय न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र गुरुवारी झालेल्या सुनावणीत या न्यायालयाचे न्यायाधीश अँड्रू हेनशॉ यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयास स्थगिती देण्यास नकार दिला. तसेच, त्या निकालास आव्हान देण्याची परवानगीही मल्ल्याला देता येणार नाही, असे स्पष्ट केले.

लंडन न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार आता भारतीय बँकांना मल्ल्याच्या १.१४ अब्ज पौंड किमतीच्या लंडनस्थित मालमत्ता जप्त करण्याची परवानगी मिळाली आहे. भारतीय बँकांचा हा मोठा विजय असल्याचे मानले जात आहे. यामुळे आता इतर कर्जबुडव्यांनाही चपराक बसणार आहे.

 

उद्योजक मित्र फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लिक करा


Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!