IT रिटर्न भरणाऱ्यांमधे गेल्या वर्षीपेक्षा दुपटीने वाढ. मागील वर्षी १.७ कोटी करदात्यांनी कर भरला होता. यावर्षी हाच आकडा तीन कोटींवर पोहचला आहे. तसेच १ कोटी करदात्यांनी २०१७-१८ मध्ये पहिल्यांदाच कर भरला होता. यावर्षी हाच आकडा सव्वा कोटींवर नेण्याचे सरकारसमोर लक्ष्य आहे. दरम्यान २०१७-१८च्या तुलनेत ८० टक्के जास्त रिफंडही क्लेम करण्यात आले आहेत. आतापर्यंत ७७,७०० कोटींची रक्कम रिफंडसाठी मंजूर झाली आहे जी गेल्यावर्षी ५७,५५१ कोटी रुपये इतकी होती. या रकमेतही ३५ टक्क्यांची वाढ झाली आहे.
थकीत कर वसुलीसाठी हालचाली. नोंदणी रद्द केलेल्या तसेच, बनावट कंपन्यांकडून देय असलेली थकीत करांची रक्कम वसूल करण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) कठोर धोरण अवलंबले आहे. या कंपन्यांच्या थकीत करांची वसुली करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध ऑगस्टअखेरपर्यंत राष्ट्रीय कंपनी लवादाकडे याचिका दाखल करण्याचे काम पूर्ण करा, असा आदेश सीबीडीटीने प्राप्तिकर विभागाला दिला आहे. सीबीडीटीने नुकत्याच जाहीर केलेल्या कृतियोजनेमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोट्यवधी रुपयांची वसुली अपेक्षित आहे.
मागील आठवड्यापासून मार्केटमधे सुरु असलेली वाढ आजही कायम राहिली. सेन्सेक्स १५० अंशांपेक्षा जास्त वधारून दिवसाअखेर ३७४९४ अंशांवर बंद झाला. तर निफ्टी ४१ अंशांच्या वाढीसह ११३१९ अंशांवर बंद.
मेहुल चोक्सी वर बाहेर देशात जाण्यासाठी बंदी घालण्याची भारत सरकारची अँटिग्वा, बर्म्युडा सरकारला विनंती. भारताचा अँटिग्वा शी गुन्हेगार हस्तांतरण करार नसल्यामुळे अडचण.
भारतीय कंपन्यांनी यावर्षी ९८ अब्ज डॉलर्स च्या विविध डील केल्या आहेत. यातली वॉलमार्ट-फ्लिपकार्ट ची १६ अब्ज डॉलर्स ची डील सर्वात मोठी आहे. मागील यावर्षी हा एकदा ९२ अब्ज डॉलर्स होता. या वर्षाखेरपर्यंत हा आकडा किती वाढतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
भारतीय म्युच्युअल फंड व्यवसाय २०२५ पर्यंत १०० लाख कोटी रुपयांवर पोचण्याची शक्यता महिंद्रा म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष बिश्नोई यांनी व्यक्त केली आहे. ‘म्युच्युअल फंड सही है’ या मोहिमेच्या माध्यमातून सुरु असलेल्या जनजागृतीमुळे म्युच्युअल फंड्स मध्ये मोठी वाढ झाली आहे.