लघुद्योगांसाठी PMEGP सबसिडी स्कीम


PMEGP …. प्रधानमंत्री रोजगार निर्माण योजना. या योजनेअंतर्गत रु. २५ लाख पेक्षा कमी किमतीच्या कोणत्याही मॅनुफॅक्चरिंग प्रोजेक्ट साठी व रु. १० लाख पेक्षा कमी गुंतवणुकीच्या सर्व्हीस ईंडस्ट्री साठी १५ ते ३५% पर्यंत अनुदान मिळते.

तसेच प्रोजेक्ट कॉस्ट च्या ९५% पर्यंत बँकेकडून कर्ज मिळू शकते.
यासंदर्भात स्थानिक राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन माहिती घ्यावी. कर्ज किती द्यायचे हा बँकेचा अधिकार आहे. ९५% हे जास्तीत जास्त आहे. परंतु शक्यतो बँक ७५% कर्ज देते. त्यामुळे प्रोजेक्ट कॉस्ट च्या किमान २५% रक्कम हाती असेल याची दक्षता घ्यावी.

याची प्रक्रिया कशी असते ?
१. http://www.kviconline.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुमच्या प्रोजेक्टसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. (तसेच या वेबसाईट वर तुमच्या जास्तीत जास्त प्रश्नांची ऊत्तरे FAQ च्या माध्यमातुन मिळतील.)
२. या अर्जात तुमचे कागदपत्रे जोडावी लागतात, तसेच व्यवसायाची संपूर्ण माहिती भरावी लागते
३. यात तुम्ही ज्या बँकेकडून कर्ज घेऊ इच्छित त्या बँकेचे नाव सुद्धा लिहावे लागते
४. अर्ज भरल्यानंतर संबंधित विभागाकडून तुमच्या प्रोजेक्टची शहानिशा केली जाते.
५. प्रोजेक्ट अप्रूव्ह केल्यानंतर या विभागाकडून तुम्ही सांगितलेल्या बँकेकडे सँक्शन लेटर पाठवले जाते. हे अप्रूव्हल येण्यासी ३-५ महिने लागू शकतात.
६. हे पत्र पोहोचल्यानंतर तुम्ही संबंधित बँकेमध्ये तुमच्या व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट व कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे दाखल करावेत
७. बँकेकडून कर्ज मंजूर झाल्यावर प्रोजेक्ट उभा झाल्यावर सबसिडी साठी पुढील प्रोसेस करावी लागते.
८. यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे, बिल, खर्चाचा तपशील तसेच इतर बाबींची जमवाजमव करणे आवश्यक असते.
९. स्थानिक स्तरावर सामान्यपणे बँक अधिकारीच प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर स्वतःहूनच प्रोजेक्ट सर्व्हे करून सबसिडी क्लेम करतात.

सबसिडी क्लेम झाली तरी तुम्हाला कधीही लगेच रोख स्वरूपात मिळत नसते. ती बँकेत किमान तीन वर्षासाठी FD च्या रूपात ठेवली जाते. तीन वर्षे तुम्ही कर्जाचे हफ्ते नियमितपणे भरल्यास हि सबसिडी रक्कम तुम्हाला देण्यात येते किंवा राहिलेल्या कर्जाच्या रकमेत वळती करून घेतली जाते.

महत्वाची टीप –
हि सबसिडी संदर्भात माहिती असली तरी याचा उद्देश तुम्हाला याबाबत माहिती उपलब्ध करून देणे हा आहे.
फक्त सबसिडी बघून व्यवसाय सुरु करायचा नसतो.
सबसिडी ही फक्त तुम्हाला व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात थोडा आधार मिळण्यासाठी आहे
सबसिडीला अंतिम उद्दिष्ट मानू नका
एखाद्या व्यवसायासाठी सबसिडी उपलब्ध नसेल तरी तो व्यवसाय जर तुमच्यासाठी योग्य असेल तर सुरु करायला कचरू नका.

अधिक माहितीसाठी व शहानिशा करण्यासाठी जिल्हा ऊद्योग केंद्रात संपर्क करावा किंवा http://www.kviconline.gov.in या वेबसाईट ला भेट द्या

धन्यवाद

उद्योजक मित्र

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


One thought on “लघुद्योगांसाठी PMEGP सबसिडी स्कीम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!