जगातील पाहली कंपनी
मोबाईल उत्पादनात जगातील आघाडीची कंपनी ‘अॅपल’ गुरुवारी जगातील पहिली एक ट्रिलियन डॉलर बाजार भांडवल (मार्केट कॅपिटल) असणारी कंपनी बनली आहे. हा बहुमान प्राप्त करण्यासाठी ‘अॅपल’ केवळ १६ अब्ज डॉलरने मागे होती. शेअरमध्ये तेजी आल्याने कंपनीने हा मान प्राप्त केला आहे.
‘अॅपल’नंतर अॅमेझॉनचा क्रमांक असून, या दोन कंपन्यांनंतर अल्फाबेटचा (गुगल) क्रमांक आहे. ‘अॅपल’चे शेअर काल २०७.०५ अमेरिकी डॉलर या आतापर्यंतच्या सर्वाधिक उच्चस्तरावर पोहोचले आणि कंपनीने एक ट्रिलियन अमेरिकी डॉलरचा टप्पा पार केला. ‘अॅपल’ने मंगळवारी आपल्या तिमाही परिणामांची माहिती देताना म्हटले आहे की, सप्टेंबरमध्ये कंपनी आयफोनपेक्षा महाग फोन बाजारपेठेत आणणार आहे. त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ५ टक्के वाढ पाहावयास मिळाली. कंपनी स्थापन करण्यात ज्यांचा सिंहाचा वाट होता त्यांना म्हणजेच स्टीव्ह जॉब्ज यांना कंपनीमधून महेर काढल्यानंतर १९९७ मध्ये ‘अॅपल’ दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आली होती. आपले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी कंपनीने स्टिव्ह जॉब्स यांना सीईओ म्हणून परत आणले. जॉब्स यांनी आयपॉड आणि आयफोनसारखे उत्पादने आणून ‘अॅपल’ला एका नव्या उंचीवर नेले. आज कंपनी जगातील एकमात्र कंपनी आहे जिचे बाजारमूल्य १ ट्रिलियन डॉलर्स पेक्षा जास्त आहे.
१००० अब्ज डॉलर्स मार्केट कॅपचा बहुमान यापूर्वी चीन च्या ऑइल गेंट पेट्रोकेम चायना या कंपनीला मिळाला होता. परंतु यांनतर या कंपनीचे बाजारमूल्य वेगाने खाली आले व आता २०५ अब्ज डॉलर्स वर आहे.