जुलै मध्ये ९६,४८३ कोटी GST संकलन


जीएसटीच्या (वस्तू व सेवाकर) महसुलात जुलैमध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जीएसटीपोटी जुलैमध्ये सरकारकडे ९६,४८३ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला, अशी माहिती बुधवारी देण्यात आली. जूनच्या तुलनेत जीएसटी संकलनात सुमारे ८०० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या पत्रकात ही माहिती देण्यात आली.

मेमध्ये जीएसटीच्या माध्यमातून सरकारला ९५,६१० कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. जुलैमध्ये ९६,४८३ कोटी रुपयांचा जीएसटी महसूल जमा झाला. जुलैमध्ये ६६ लाख व्यावसायिकांनी जीएसटीचे विवरणपत्र दाखल केले. जीएसटी लागू झाल्यानंतर एका महिन्यात जमा होणाऱ्या विवरणपत्रांमधील हा उच्चांकी आकडा आहे.

‘जीएसटीमधून झालेले करसंकलन हे समाधानकारक स्तरावर आहे. अर्थात, त्यात आणखी वाढ होणे अपेक्षित आहे. ई-वे बिल प्रणाली लागू झाल्यानंतर जीएसटीमधील करचुकवेगिरीला मोठ्या प्रमाणावर आळा बसला आहे,’ असेही या पत्रकात म्हटले आहे.

 

उद्योजक मित्र फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लिक करा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!