मेंदूला विचार करायला भाग पाडा


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

आपल्याला लहानपणापासून घोकणपट्टीची, सांगकाम्यासारखे वागायची सवय लागलेली आहे. लहानपणी आपल्याला प्रश्न विचारण्याची परवानगी नसते. समोर दिसतंय तसं आहे, उगाच प्रश्न विचारून आपली अक्कल पाजळु नये. घरच्यांच्या कोणत्याही निर्णयाला विरोध दर्शवायची सुद्धा परवानगी नसते. मजुरासारखं काम केल्यासारखा अभ्यास करायचा, हुकूमशाहीसारखे पालकांचे आदेश पाळायचे… आपल्याला मेंढरासारखं वागायला आपलं घर भाग पाडतं.

यानंतर दुसरा क्रमांक लागतो तो म्हणजे आपल्या शिक्षणपद्धतीचा. आपली शिक्षणपद्धती हि चांगले नोकर तयार करायचे काम करते. पुस्तकात जस दिलंय तसंच परीक्षेत लिहिलं तर पैकीच्या पैकी मार्क पडतील. आम्ही सांगूत तशीच वाक्ये उत्तरपत्रिकेत वापरली पाहिजेत. व्याख्या जशीच्या तशी लिहायला हवी , तरच मार्क पडतील. या व्याख्येच्या नादात किती जणांच्या आयुष्याचं व्याख्या विख्खी वुख्खु झालंय याची गणतीच नाही. शाळेसारखीच परिस्थिती कॉलेजमध्येही असतेच, पुढे ग्रॅज्युएशन ला तर आपल्याला उत्तमातील उत्तम नोकर बनवण्यासाठी तयार केलं जात. देशातील MBA कॉलेजेस उद्योजक बनवण्यासाठी नाही, तर उत्तम मॅनेजमेंट चे नोकर बनवण्याचे काम करतात.

हे असं वागा, हे असंच बोला, हे असच्या असंच लिहा… एखादी नवीन संकल्पना मांडावी तर समोरून “का?” असा प्रश्न येतो… खरं तर याऐवजी “काय?” असा प्रश्न यायला हवा हे आपल्या डोक्यातही येत नाही. या “का?” प्रश्नाने किती स्वप्ने उजाड केली गिणतीच नाही.

शिक्षण हे फक्त हुशार होण्यासाठी आवश्यक असतं इतर कोणत्याही कामासाठी नाही. शिक्षणाने हुशार झाल्यावर पुढे काय करायच याचा निर्णय ज्याच्या त्याच्या बुद्धीवर सोडून द्यायला हवा. पण आपल्याकडे या बुद्धीवरच संमोहिनी टाकली जात आहे. परीक्षेतल्या मार्कावर हुशारी ठरवणाऱ्या समाजाकडून खूप काही भव्य दिव्य घडण्याची अपेक्षा करता येत नाही. आणि मागच्या २०-२५ वर्षात तर याचा आपण पुरेपूर अनुभव घेत आहोत.

आपल्या मेंदूला कोणताही विचार करायची परवानगीच नाही. जे समोर दिलंय ते पाहायचं, रट्टा मारायचा, आणि पुढे मांडायचं. स्वतःच मत मांडायचं नाही. एखाद्य्या मेंढरासारखं बनवून ठेवलंय आपल्याला. “निव्वळ मूर्खपणा” या शब्दाव्यतिरिक्त आपल्या शिक्षणपद्धतीला दुसरा कोणताही शब्द शोभत नाही. याचाच परिणाम आज आपला देश भोगत आहे. चांगले उद्योजक बनण्याऐवजी आपण चांगले नोकर बनवण्याला प्राधान्य दिले, आणि याचा परिणाम आपली विचारशक्तीच खुंटण्यात झाला आहे. नवीन कशाचा शोध लावण्याची आपली वृत्ती दिसत नाही, नवीन प्रयोग करण्याची आपली मानसिकता दिसत नाही, नवीन क्षेत्रात काहीतरी करण्याची आपली हिम्मत होत नाही.

आपली मेंढराची वृत्ती सर्वात जास्त ठळकपणे दिसते ती उद्योग क्षेत्रात. आजकाल तर व्यवसाय करण्याचा विचार करताच युवा उद्योजक एखाद्या मेंढरासारखंच वागताना दिसतो. तुम्ही सांगा कोणता व्यवसाय करू, तुम्ही सांगा कसा व्यवसाय उभा करू, तुम्ही सांगा पैसे कुठून उभे करू, तुम्हीच सांगा कसा यशस्वी होऊ, तुम्हची सांगा… अरे काय काय सांगायचं ? किती वेळा सांगायचं ? कुणा कुणाला सांगायचं ? अशाने व्यवसाय होत असतो का? स्वतःच्या बुद्धीने काहीतरी करा. हि मेंढराची मानसिकता नोकरीत चालते, व्यवसायात नाही.

आपला मेंदू वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून सडत पडलेला आहे त्याला जरा तरी कामाला लावा. या आपल्या सुस्तावलेल्या मेंदूने मागील कित्येक वर्षात एकाही नवीन विषयावर विचार केलेला नाही, एकही संकल्पनेवर विचार केलेला नाही, अशावेळी त्याला जागृत करायला थोडा तरी वेळ लागेलच ना? तो वेळ लागू द्या, त्याला जमतील तेवढे धक्के द्या, पण व्यवसाय करायचा असेल तर तुमच्याच मेंदूला विचार करायला भाग पाडा.

इतरांकडून उधारीचे ज्ञान घेऊन आपण नोकर बानू शकतो, मजूर बनू शकतो, उद्योजक नाही. उद्योजक चा मुद्दा बाजूला ठेवला तरी या उधारीच्या ज्ञानावर आपण यशस्वी सुद्धा होऊ शकत नाही, माग ते क्षेत्र नोकरी असो किंवा व्यवसाय.

बाबा रणछोडदास बिलकुल सही केहते थे.. बच्चा, काबील बनो… काबील. कामयाबी झक मारके पीछे आयेगी… हा थ्री इडियट्स चित्रपटातील डायलॉग मला यामुळेच आवडतो.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!