टेस्लाचे सीईओ अॅलन मस्क यांनी मंगळवारी केलेल्या एका घोषणेमुळे त्यांच्या संपत्तीमध्ये तब्बल ९६०० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. अॅलन मस्कयांनी मंगळवारी ट्विटर वरून “आपण टेस्ला कंपनी वॉल स्ट्रीटमधून बाहेर काढून प्रायव्हेट कंपनी बनवण्याचा विचार करत आहोत” अशी घोप्शन केली होती. तसेच कंपनीच्या भागधारकांकडून 420 डॉलर (28 हजार 800 रुपये) प्रति शेअर दराने समभाग परत खरेदी केले जातील,” अशीही माहिती दिली होती.
या ट्विटनंतर टेस्लाच्या शेअर्सचे भाव मोठ्या प्रमाणात वधारले. शेअरची किंमत 11 टक्क्यांनी वाढून 379.57 डॉलर एवढी झाली. शेअरची किंमत वधारल्याने मस्क यांच्या संपत्तीमध्येही 9 हजार 600 कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. 47 वर्षीय मस्क हे टेस्लामधील सर्वात मोठे भागधारक असून, ते जगातील 31 वे श्रीमंत व्यक्ती आहेत.
जर मस्क यांनी आपल्या योजनेनुसार इलेक्ट्रिक कार कंपनी असलेल्या टेस्ला ला सार्वजनिक कंपनीमधून प्रायव्हेट कंपनी बनवले तर हा अशा प्रकारचा सर्वात मोठा व्यवहार असेल. तसेच 420 डॉलर प्रति शेअर च्या हिशोबाने हा व्यवहार 72 अब्ज डॉलरचा (सुमारे ४ लाख ९६ हजार कोटी रुपये) असेल.