भारतातील ऑनलाईन शॉपिंग इंडस्ट्री ची उलाढाल लवकरच वार्षिक साडे तीन लाख कोटीं रुपयांपर्यंत (५० अब्ज डॉलर्स) जाईल असं अंदाज एका रिपोर्ट मध्ये वर्तवण्यात आला आहे. देशात ४० कोटी इंटरनेट वापरकर्ते आहेत. यापैकी १५ कोटी यूजर्स ऑनलाईन शॉपिंग ला प्राधान्य देतात. ईकॉमर्स कंपन्यांकडून हा एकदा वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात यर्त आहेत. याचाच परिणाम म्हणून येत्या काळात ईकॉमर्स इंडस्ट्रीमधील उलाढाल मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचे रिपोर्ट मध्ये म्हटले आहे.
प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी हे जगातील ११ वे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ५० अब्ज डॉलर्स (३.५० लाख कोटी रुपये) पर्यंत पोहोचली आहे. अंबानी यांच्या या संपत्ती वाढीचे मुख्य करंट रिलायन्स चे वधारले शेअर्स आहेत. मागील वर्षभरात जिओ च्या लॉन्चिंग नंतर रिलायन्स च्या शेअर्स ने १००% पेक्षा जास्त वाढ नोंदवलेली आहे. अंबानींची संपत्ती वाढण्यात झाला आहे. कंपनीने मागील वर्षभरात आपल्या शेअर होल्डर्स ना चांगलेच श्रीमंत बनवले आहे. पुढील काळातही कंपनीची घोडदौड अशीच चालू राहणार असा कयास आहे.
बजाज इलेक्ट्रिकल्सचे व्यवस्थापकिय संचालक, सुप्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांचे पुतणे आणि शेखर बजाज यांचे पुत्र अनंत बजाज यांचे निधन झाले आहे. ते ४१ वर्षांचे होते. शुक्रवारी संध्याकाळी अनंत बजाज यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना रूग्णालयात घेऊन जात असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
हैदराबाद मधे नवीनच सुरु झालेल्या IKEA च्या देशातील पहिल्या मॉल च्या उदघाटनानंतर पहिल्याच दिवशी ग्राहकांनी प्रचंड गर्दी केल्याने संपूर्ण नियोजन कोलमडले. एकाच दिवसात तब्बल ४० हजार ग्रहांनी या मॉल ला भेट दिली. यामुळे प्रशासनावरही ट्राफिक नियंत्रणाचा ताण आला. अति गर्दीमुळे माल बाहेर ट्राफिक पूर्णपणे ठप्प झाली होती. IKES हि जगातील सर्वात मोठी फर्निचर कंपनी आहे. हैदराबाद मध्ये कंपनीने नुकतेच आपला देशातील पहिला मॉल सुरु केला आहे. मॉल ४,५०,००० स्क्वे. फू. पेक्षा जास्त जागेत उभारलेला आहे. २०२५ पर्यंत कंपनीचे देशभरात २५ मॉल सुरु करण्याचे उद्दिष्ट आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशातील अग्रगण्य ईकॉमर्स कंपन्या फ्लिपकार्ट आणि अमेझॉन यांच्यामध्ये पुन्हा डिस्काउंट युद्ध बघायला मिळत आहे. दोनीही कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट ऑफर करत ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न चालवला आहे.
दोन हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा कोणताही विचार नाही, असे शुक्रवारी सरकारने लोकसभेत स्पष्ट केले. ही नोट लवकरच बाद होणार आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. याच्या लेखी उत्तरात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पोन राधाकृष्णन यांनी हा निर्वाळा दिला. अशी कोणतीही योजना सरकारच्या विचाराधीन नाही, असे ते म्हणाले.
मुंबई-अहमदाबाद या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या घोषणेनंतर केंद्र सरकारने देशभरात बुलेट ट्रेनचे जाळे निर्माण करण्याचे संकेत दिले आहेत. देशभरातील प्रमुख महानगरे अतिजलद रेल्वेने जोडण्याच्या योजनेच्या दृष्टीने आणखी सहा संभाव्य बुलेट ट्रेनमार्ग सरकारने निश्चित केले आहेत.