टाटा उद्योगसमूह हा भारतातल्या सर्वात मोठ्या खाजगी उद्योगसमूहांपैकी एक आहे. बाजार भांडवल आणि महसुलाचा विचार करता भारतातील हा आघाडीचा समूह आहे रसायने, पोलाद, वाहननिर्मिती, माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार, ऊर्जा, चहा आणि हॉटेल या क्षेत्रांत या समूहातील कंपन्या प्रामुख्याने आघाडीवर आहेत. सहा खंडांतील ८० हून अधिक देशांत टाटा समूहाचे कामकाज विस्तारले आहे. टाटा उद्योगसमूहाचे मुख्यालय मुंबईमधे आहे.
इतिहास
टाटा समूहाची सुरुवात १८६८ मध्ये झाली. भारतावर ब्रिटिश राजवट असताना जमशेटजी नसरवानजी टाटा यांनी कापसाचे व्यवहार करणारी कंपनी स्थापन केली. त्यानंतर नागपूरमध्ये १८७७ मध्ये एम्प्रेस मिल्स स्थापन झाली. यानंतर टाटा समूहाने मुंबईत मध्ये ताजमहाल हॉटेल सुरू केले. १९०४ मध्ये जमशेटजींच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र दोराब टाटा समूहाचे चेअरमन झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली समुहाने पोलादनिर्मिती आणि जल विद्युतनिर्मिती प्रकल्प सुरू केले. सर दोराब टाटा यांच्या मृत्यूनंतर १९३४ मध्ये नवरोजी सकलातवाला यांनी पुढची सुमारे चार वर्षे समूहाची धुरा वाहिली. १९३८ मध्ये जहांगीर रतनजी दादाभाई अर्थात जे.आर.डी. टाटा हे या समूहाचे चेअरमन झाले. जे.आर.डी. टाटा हे भारतातील आजवरचे कदाचित सर्वात जास्त लोकप्रिय उद्योजक म्हणता येतील. जे.आर.डी. टाटा आजही भारतीय उद्योगजगताचे पितामह समजले जातात. सूत्रे हातात घेतल्यानंतर जे.आर.डी. नि टाटा समूहाचा विस्तार मोठ्या प्रमाणात केला. टाटा केमिकल्स, टेल्को (आता टाटा मोटर्स), टाटा इंडस्ट्रीज, टाटा टी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि टायटन इंडस्ट्रीज ही या काळात सुरू झालेल्या काही महत्त्वाच्या कंपन्यांची नावे होत.
रतन टाटा यांनी जेआरडींकडून १९९१ मध्ये सूत्रे स्वीकारली. रतन टाटांच्या कार्यकाळात टाटा ग्रुप ने आंतरराष्ट्रीय पातळीवर छाप सोडली. जगभरातील मोठमोठे उद्योग घेण्याचा टाटांनी सपाटा लावला. जग्वार, लँड रोव्हर सारखे नामांकित ब्रँड्स टाटा सन्स च्या नियंत्रणात आले. टाटाच्या आंतरराष्ट्रीय कंपन्या टेकओव्हर करण्याच्या यशस्वी प्रयत्नानंतर देशातील मोठमोठ्या कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय कंपन्या विकत घेण्याचा सपाटा सुरु केला. रतन टाटांच्या कार्यकाळात टाटा समूह एका वेगळ्याच उंचीवर पोहोचले. रतन टाटांच्या निवृत्तीनंतर सायरस मिस्त्री हे टाटा उद्योग समूहाचे नवे अध्यक्ष झाले. परंतु समूहाच्या तत्वांच्या विपरीत कामकाजाच्या पद्धतीमुळे त्यांना पदावरून हटवण्यात आले. सध्या टाटा समुखाचे कामकाज रतन टाटा यांच्याच अध्यक्षतेखाली चालू आहे.
टाटा उद्योगसमूहाच्या अध्यक्षांची यादी
जमशेदजी टाटा (१८८७-१९०४)
सर दोराब टाटा (१९०४-१९३२)
नवरोजी सकलातवाला (१९३२-१९३८)
जे. आर. डी. टाटा (१९३८-१९९१)
रतन टाटा (१९९१-२०१२)
सायरस मिस्त्री (२०१२-२०१६)
काही कारणांमुळे मिस्त्रींना अध्यक्षपदावरून हटवून पुन्हा रतन टाटांकडे तात्पुरत्या काळासाठी सूत्रे देण्यात अली.
नटराजन चांद्रशेखरन (२०१७ ते आजपर्यंत)
टाटा उद्योगसमूहाचे सामाजिक कार्यात योगदान
टाटा उद्योगसमूहाने विविध संशोधन, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या उभारणी मध्ये आर्थिक योगदान दिले आहे. उद्योग समूहाच्या लोकोपकारी कार्याची दाखल घेऊन २००७ साली समूहाला कार्नेज पदकाने गौरविण्यात आले.
टाटा उद्योग समूहाने स्थापन केलेल्या काही संस्थांची सूची.
टाटा मूलभूत संशोधन संस्था
भारतीय विज्ञान संस्था
टाटा व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्र
टाटा फुटबॉल अकादमी
टाटा क्रिकेट अकादमी
टाटा मेमोरिअल हॉस्पिटल
टाटा समूहाच्या अंतर्गत येणारे काही नामांकित ब्रँड्स व व्यवसाय क्षेत्र
Tata Motors, Jaguar, Land Rover, Tata Steel, TCS, Titan, Tanishq, Tata Capital, Tata AIG, Food Products, Taj & Other Hotels Chain, Croma, Titan Eye, Westside, Vistara, Tata Sky, Fast Track, Photon
टाटा ग्रुप हा देशातील सर्वात मोठ्या उद्योगसमूहांपैकी एक आहे. टाटाच्या स्थापनेपासून ते आजतागायत भारतीय उद्योगक्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात टाटा समूहाचे सर्वोच्च स्थान अबाधित आहे. सामान्य जनतेचे प्रेम लाभलेल्या काही मोजक्याच उद्योगांमध्ये टाटा समूह आहे. टाटा सन्स चे निम्म्यापेक्षा जास्त उत्पन्न आजही सामाजिक कार्यासाठी खर्च होते. टाटा उद्योगसमूक हा खऱ्या अर्थाने भारतीय उद्योगक्षेत्रातील ध्रुवतारा आहे…
संकलन ::
उद्योजक मित्र
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील