ब्रँड महत्वाचा आहे… व्यवसायात आणि वैयक्तिक जीवनात सुद्धा…


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

विस हजारात बनणारा अॅप्पल आयफोन लाखात विकला जातो तो ब्रँडमुळेच….

घरच्या काॅफीसारखीच असणारी काॅफी आपण CCD मधे दोनशे रुपयाला घेतो ते ब्रँडमुळेच…

मुंबईच्या व्होलसेल मार्केटमधला एखादा टिशर्ट एका दुकानात दोनशेला विकला जातो तर एकात हजारमधेही विकला जातो ते ब्रँडमुळेच…

भारत बांग्लादेश मधे बनवले गेलेले शुज नाईकीचे लेबल लावुन पाच हजारात विकले जातात आणि तेच शुज विना ब्रँड हजार रुपयात सुद्धा कुणी लवकर घेत नाही… कारण ? ब्रँड…

हातगाडीवरचा वडा पाव पंधरा रुपयात सुद्धा महाग वाटतो, आणि तेच एखाद्या मोठ्या हटेल मधे असेल तर १०० रुपयात सुद्धा सहज विकत घेतला जातो…. ब्रँड

एका छोट्या कपड्याच्या दुकानात दुकानदाराशी तासभर बार्गेनींग केली जाते, तर तेच मोठ्या शोरुम मधे असाल तर मुकाट जी किंमत असेल ती दिली जाते …. मोठ्या शाॅप चं स्टेटस तुम्हाला दबावात आणत.. त्यांचा ब्रँड तुम्हाला नकळत त्यांच वर्चस्व मान्य करायला भाग पाडतो….

PNG ला ब्रँड बनवायला पन्नास साठ वर्षे लागली, आणि दक्षिणेत प्रसिद्ध असला तरी महाराष्ट्रात काल परवा आलेला कल्याण ज्वेलर वर्षात ब्रँड झाला… कारण? फिल्म ईंडस्ट्रीमधला सर्वात मोठा ब्रँड Big B त्यांची जाहीरात करत होता. पण याचवेळी उद्या एखादी चुक झाली तर कल्याण ज्वेलर्स चा ब्रँड लगेच खराब होईल पण PNG चा नाही, कारण एकाने आपले कर्त्तृत्व वर्षानुवर्षे सिद्ध केलंय आणि दुसऱ्याने एका ब्रँड ला सोबत घेउन आपला ब्रँड वर्षभरात तयार केलाय…

एखादा नवखा अॅक्टर कितीही चांगला असला तरी त्याला आमीर खान सारखे मानधन मिळू शकत नाही…. कारण त्याची ब्रँड व्हॅल्यू कमी असते.

सचिन तेंडुलकर आजही जाहिरात मानधनाच्या स्पर्धेत टॉप ३ मधे आहे… “सचिन” नावाचा ब्रँड बनवण्यासाठी त्याला १५ वर्षे लागलीत.

रोल्स रॉयस सारख्या दिसणाऱ्या गाड्या चीन मधे अगदी स्वस्तात बनवल्या जातात. पण म्हणून त्यांना रोल्स रॉयस चं स्टेटस कधीच मिळू शकत नाही. शेवटी RR हा ब्रँड महत्वाचा आहे… त्या सहा कोटीच्या गाडीची ओळख या ब्रँड मुळे आहे, गाडीच्या देखाव्यामुळे किंवा त्यात मिळणाऱ्या सोयीसुविधांमुळे नाही…

ब्रँड… 

ब्रँड महत्वाचा आहे… तुम्ही तुमचं प्रोडक्ट, तुमचे नाव कशा प्रकारे प्रेझेंट करता यावर खुप काही ठरतं…

ब्रँड कशाचाही असू शकतो… तुमच्या व्यवसायाचा ब्रँड असू शकतो. तुम्ही स्वतःही ब्रँड असू शकता. राजकारणात, क्रीडा क्षेत्रात, कला क्षेत्रात… सर्वत्र ब्रँड असतोच. आपण पूर्णपणे ब्रँड्स नि घेरले गेलेलो आहोत.

पण ब्रँड बनवणे सोपे काम नाही.. त्यासाठी प्रचंड मेहनत लागते; वर्षोनवर्षे गुणवत्ता, सेवा द्यावी लागते; लोकांना तुमच्याशी जोडावे लागते; अनंत अडचणीतुन मार्ग काढत अस्तित्व सिद्ध करावे लागते; भुतकाळातुन शिकावे लागते, भविष्याचा वेध घेउन वाटचाल करावी लागते; चढ उतारांचा सामना करावा लागतो… तेव्हा कुठे तुमचा ब्रँड बनण्याची प्रक्रिया सुरु होते… आणि यासोबतच हवी असते योग्य ब्रॅण्डिंग स्ट्रॅटेजि…

तुमचे वा तुमच्या व्यवसायाचे नाव ब्रँड बनवण्यासाठी फक्त कष्ट नाही तर नियोजनही आवश्यक असते. तुम्हाला लोकांनी का किंमत द्यावी, तुमच्यात असे काय आहे ज्यामुळे लोकांनी तुम्हाला इतरांपेक्षा वरचा दर्जा द्यावा, याची उत्तरे लोकांना द्यावी लागतात…

प्रत्येक ब्रँड ची एक खासियत असते, ती खासियत लोकांना दिसायला हवी, जाणवायला हवी. हि खासियत जेव्हा लोकांना दिसते, जाणवते तेव्हा ब्रँड बनायला सुरुवात होते… जेव्हा लोक स्वतःहून तुम्हाला वर्चस्व प्रदान करतात तेव्हा ब्रँड बनायला सुरुवात झालेली असते… जेव्हा लोक तुमच्या पाठीमागेही तुमचे गुणगान गातात तेव्हा ब्रँड बनायला सुरुवात झालेली असते.

गुणवत्ता, प्रचार, वर्चस्व, प्रेझेन्टेशन, आकर्षण, खासियत या सगळ्यांची गोळाबेरीज करून ब्रँड बनतो…
ब्रँड ऐसेही नाही बनता… उसे तडका देना पडता है… हा तडका म्हणजे हि गोळाबेरीज…

ब्रँड महत्वाचा आहे… व्यवसायात आणि वैयक्तिक जीवनात सुद्धा…

व्यवसाय साक्षर व्हा… 
उद्योजक व्हा… 
समृद्ध व्हा… 
_

श्रीकांत आव्हाड

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

One thought on “ब्रँड महत्वाचा आहे… व्यवसायात आणि वैयक्तिक जीवनात सुद्धा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!