देशातील आघाडीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे बाजार भांडवल तब्बल 8 लाख कोटींवर पोहोचले आहे. हा टप्पा ओलांडणारी रिलायन्स ही पहिली कंपनी बनली असून टीसीएस अद्याप 26 हजार कोटींनी मागे आहे.
गुरुवारी शेअर बाजाराने उसळी घेतल्यानंतर रिलायन्सच्या शेअर्समध्ये वाढ झाली. बीएसईमध्ये शेअरने 1.5 टक्क्यांची वाढ नोंदवत 1290.90 रुपयांवर जाऊन पोहोचला. तर एनएनईमध्ये 1265.90 पर्यंत वाढला. 11 वर्षांनंतर 12 जुलैला रिलायन्सने दुसऱ्यांदा 100 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला होता. रिलायन्स आणि आयटी क्षेत्रातील टीसीएस या दोन कंपन्यांमध्ये मागील काही महिन्यांपासून देशातील सर्वात मोठी कंपनी होण्यासाठी चढाओढ चालू आहे. मात्र, या स्पर्धेत रिलायन्स वेगाने पुढे सरकत आहे. टीसीएसचे बाजार मुल्य 7.79 लाख कोटी रुपये आहे. रिलायन्सच्या शेअर्समध्ये गेल्या एक वर्षात 60 टक्के वाढ झाली आहे. तर याच कालावधीत टीसीएसचे शेअर्स 63 टक्क्यांनी वाढले आहेत. या दोनीही कंपन्यांनी मागील दोन वर्षात लाखो गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.
मुकेश अंबानी यांनी 2025 पर्यंत रिलायन्स दुप्पट विस्तार करण्याचे स्वप्न पाहत आहे असे काही महिन्यांपूर्वी सांगितले होते. रिलायन्स वाटचाल पाहता रिलायन्स त्याआधीच हा टप्पा पार करेल असे वाटत आहे.
उद्योजक मित्र