स्टीफन हॉकिंग…. एका दुर्धर आजारामुळे ९३% शरीर काम करत नसतानाही विज्ञान, तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रात आपले एक अढळ स्थान निर्माण करणारा महानायक.
स्टीफन हॉकिंग यांना वयाच्या २१ व्य वर्षी कळले कि त्यांना मोटर न्यूरॉन नावाचा असाध्य आजार झालेला आहे. यामुळे ते शारीरिक दृष्ट्या पूर्णपणे कार्यरत रहाणार आहेत, आणि दोन तीन वर्षेच जगू शकतात. हे लक्षात आल्यानंतर स्टीफन म्हणाले कि माझे काम आणि आजार यांना परस्पर संबंध काहीच नाही. उलट मी माझे काम आता दुप्पट गतीने करू शकेल कारण माझ्याकडे असलेला वेळ खूप कमी आहे. स्टीफन हॉकिंग च्या जन्माचा योगायोग म्हणजे त्यांचा जन्म खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ यांच्या मृत्युनंनत बरोब्बर ३०० वर्षांनी झालेला आहे.
स्टीफन एका मशीनच्या माध्यमातून बोलत. मिनिटाला १५ शब्द ते बोलू शकत. स्टीफन यांना हालचाल बिलकुल करता येत नव्हती. तरीही स्टीफन आपल्या परीने अंतराळ क्षेत्रात दररोज नवनवीन संशोधन करत असत. जगाला त्यांनी खूप सारे अगम्य ज्ञान दिले आहे.
स्टीफन यांनी केम्ब्रिज मध्ये ब्रह्मांडाच्या विज्ञानावर संशोधन सुरु केले. त्यावेळी ते त्या क्षेत्रात काम करणारे पहिले संशोधक होते. त्यांनी अंतराळ व वेळ यासंदर्भात आईन्स्टाईन च्या संशोधनात भर टाकली. तसेच ब्लॅक होल बाबतही त्यांनी अतिशय भरीव संशोधन केले, तसेच बिग बँग थिअरी संदर्भातही त्यांनी मोठे संशोधन केले. ब्लॅक होल पूर्णपणे ब्लॅक नाही हा शोध त्यांनी लावला. तसेच आकाशात इतरही ग्रह आहेत ज्यावर जीवन आहे हे त्यांनी सांगितले.
एकदा लंडनमध्ये गणितज्ञ रॉजर पेनरोज यांचे भाषण ऐकायला स्टीफन हॉकिंग गेले. तार्यातील इंधन संपल्यावर तो बिंदूवत होऊ शकतो असे निष्कर्ष पेनरोज यांनी त्या भाषणात मांडले होते. यावरूनच स्टीफन हॉकिंग यांनी स्वतंत्र अभ्यास करून संपूर्ण विश्वाचाही तार्याप्रमाणेच अंत होऊ शकतो असा निष्कर्ष काढला, या प्रबंधावर स्टीफन हॉकिंग यांना डॉक्टरेट मिळाली. याच प्रबंधाचा पुढचा भाग सिंग्युलॅरिटीज अँड दी जीओमेट्री ऑफ स्पेसटाईम हा प्रबंध स्टीफन यांनी लिहिला. या प्रबंधासाठी १९६६ सालचे ऍडम्स प्राईझ त्यांना मिळाले.
स्टीफन हॉकिंग यांनी नंतर कृष्णविवर या विषयाकडे आपले लक्ष वळविले. यावर आइनस्टाइनच्या सापेक्षतावादाचा सिद्धांताची जोड देऊन गृहिते मांडणे सुरू केले. त्यावेळी हॉकिंग आपल्या शरीराची हालचाल करू शकण्यास असमर्थ होत गेले. एवढी अवघड गणिते त्यांनी केवळ मनातल्या मनात सोडविली. १९७४ साली हॉकिंग यांनी पहिल्यांदा पुंज यामिक (Quantum Mechanics) आणि सापेक्षतावादाचा सिद्धांतची सांगड घालून दोन सिद्धांतांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. स्टीफन हॉकिंग यांच्या या प्रबंधाला आधी जोरदार विरोध झाला पण नंतर स्टीफन हॉकिंग यांचे मत पटल्यावर त्या नव्या निष्कर्षाप्रमाणे होणार्या किरणोत्सर्जनाला हॉकिंग उत्सर्जन असे नाव देण्यात आले. त्याच वर्षी स्टीफन हॉकिंग यांचा कृष्णविवर या विषयावरील प्रबंध इंग्लंडच्या नेचर या नियतकालिकेत प्रसिद्ध झाला आणि त्यांची रॉयल सोसायटीचा फेलो म्हणून निवड झाली.
विश्वात इतरही कित्येक ग्रहांवर जीवसृष्टी आहे आणि ती आपल्यापेक्षाही कित्येक पटींनी प्रगत आहे असे स्टीफन यांचे ठाम मत होते.
१९८० च्या दशकात हॉकिंग यांना ऑक्सफर्ड विद्यापीठ, प्रिन्स्टन विद्यापीठ, न्यूयॉर्क विद्यापीठ, लँकेस्टर विद्यापीठ या विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊन त्यांचा सन्मान केला.
विज्ञान विषयात काम करीत असतांनाच हॉकिंग यांनी अपंग लोकांसाठी, त्यांच्या सोयींसाठी आणि त्यांच्यावरील अन्यायासाठी लढा दिला. यासाठी हॉकिंग यांना १९७९ Royal Association for Disability and Rehabilitation या संस्थेकडून मॅन ऑफ दि इयर हा किताब देण्यात आला.
स्टीफन यांच्या जीवनावर आधारित The Theory of Everything हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे
यावर्षीच्या मार्च महिन्यात या अवलियाचे निधन झाले… पण जाण्यापूर्वी ते आपल्याला अगम्य असे ज्ञान देऊन गेले.
जिथे लोक हात टेकतात तेथून स्टीफन यांनी आपल्या प्रवासाला सुरुवात केली. स्वतःच्या आजाराला आपली कमजोरी न बनू देता त्याला आपली ताकद, ऊर्जा बनवणाऱ्या या शास्त्रज्ञाच्या जिद्दीला उद्योजक मित्र चा सलाम
जन्म – ८ जानेवारी १९४२
मृत्यू – १४ मार्च २०१८
ऑक्सफोर्ड मधे शिकत असताना त्यांनी कित्येक महत्वाचे शोध लावले.
१९७९ मधे केम्ब्रिज मधे प्रोफेसर म्हणून नियुक्त झाले.
स्टीफन यांना १२ मानद पदव्या मिळालेल्या आहेत
या ब्रिफ हिस्ट्री ऑफ टाईम हे त्यांचे पुस्तक बेस्ट सेलर आहे
_
उयोजक मित्र
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील