दोन वर्षातील सर्वोच्च विकासदर, चीनलाही मागे टाकले
अर्थव्यवस्थेची चालू वित्त वर्षाची सुरुवात वेगाने झाली असल्याची स्पष्ट झाले आहे. निश्चलनीकरण तसेच GST मुळे गेल्या दोन वर्षांत अर्थव्यवस्था थंडावल्याची चर्चा असतानाच चालू वित्त वर्षात मात्र अर्थव्यवस्थेने वेग पकडल्याचे शुकवारच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनाचा दर ८.२ टक्क्यांवर झेपावला आहे.
उत्पादन आणि कृषी क्षेत्र वाढीच्या जोरावर यंदाचा तिमाही अर्थवेग गेल्या १५ तिमाहीतील सर्वोच्च नोंदला गेला आहे. यापूर्वीचा सर्वोत्तम, ८.४ टक्के हा तिमाही दर जुलै ते सप्टेंबर २०१४ दरम्यान होता. देशाचा यंदाचा विकास दर हा चीनच्या ६.७ टक्क्यालाही मागे टाकणार आहे. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत निर्मिती क्षेत्राची वाढ १३.५ टक्के तर कृषी क्षेत्राची वाढ ५.३ टक्के नोंदली गेली.
तमाम अर्थतज्ज्ञ, बँका तसेच दलालीपेढींचे प्रमुख यांच्यामते हा दर ७.६ टक्के एवढा राहण्याची शक्यता होती. मात्र त्यांच्या अंदाजापेक्षा हा विकास दर खूपच पुढचा आहे. उद्योगक्षेत्रासाठी हि आनंदाची बातमी आहे.