हलक्या कानाचे बनू नका. व्यवसायातले राजकारण समजून घ्या…


लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

कुणीतरी कुणाबद्दलतरी काहीतरी सांगतंय म्हणून त्यावर विश्वास ठेऊ नका. आपल्याकडे काड्या करणाऱ्यांची कमतरता नाही, त्यात तुम्ही यशस्वी होत असाल तर तुमचे पाय मागे ओढायला पुढे येणाऱ्यांची तर बिलकुलच कमी नाही..

हे लोक नेहमीच तुम्हाला कमकुवत करण्याच्या प्रयत्नात असतात. यात सगळ्यात मोठी खेळी असते ती म्हणजे तुमच्या कार्यक्षम सहकाऱ्यांना तुमच्यापासून लांब करणे. अशा वेळी मग त्यांच्याबद्दल खोट्या पण तुम्हाला धक्का देणाऱ्या बातम्या तुमच्या कानावर सतत आदळत राहतील याची काळजी घेतली जाते. एखाद्या वेळेस तुम्ही अशा लोकांना नजरअंदाज करताल पण तरीही हे लोक थांबत नाहीत आणि सतत तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांच्या विरोधात भडकवण्याचे पुण्य कर्म करत राहतात…

अशावेळी तुम्ही सतर्क राहणे खूप आवश्यक असते. कुणी काहीही सांगो तुम्ही कधीही इतरांच्या सांगण्यावर विश्वास ठेवायचा नसतो. स्वतःच्या बुद्धीला जे योग्य वाटते तेच करायचे असते. इतरांच्या बुद्धीने चालायला लागलात कि तुमची अधोगती सुरु झालीच म्हणून समजा…

यांच्या पहिल्या जाळ्यात जर तुम्ही अडकलात तर या लोकांची पुढची खेळी असते ती तुमची निर्णय क्षमता बाधित करण्याची. एकदा तुम्ही अशा लोकांच्या अखत्यारीत गेला कि मग हे लोक तुमचे निर्णय सुद्धा त्यांच्या मनाप्रमाणे घ्यायला भाग पडतात. अशांच्या जाळ्यात तुम्ही कधी अडकत जाता हे तुम्हाला कधी कळतही नाही. कारण तुमचा त्यांच्यावर विश्वास बसावा, तुम्ही त्यांच्यावर विसंबून राहावे यासाठी ते सतत तुमचे कौतुक करत असतात.

माणूस कशाने नाही विरघळला तरी कौतुकाने विरघळतोच. कौतुक हे समोरच्याला गुंडाळण्याचे सर्वात मोठे हत्यार असते. याच कौतुकाच्या बळावर तुमचा विश्वास संपादन केला कि मग हे लोक तुमच्या निर्णयांना ताब्यात घेतात तुम्ही निर्णय त्यांच्या कलेने घ्यायला लागता…

यांची शेवटची मोठी खेळी असते ती तुम्हाला तुमच्या कामापासून दूर करून इतर गोष्टीत अडकवणे आणि तुमच्या कामांवर त्यांची सत्ता स्थापित करणे… जर पहिल्या दोन खेळ्या यशस्वी ठरल्या तर तुम्ही त्यांच्या पूर्णपणे कह्यात गेलेला असता. अशावेळी तुम्हाला व्यवसायाव्यतिरिक्त इतर कामात गुंतवून ठेऊन तुमचा व्यवसाय ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जातो, आणि तो १००% यशस्वी सुद्धा होतो. हि तुमच्या अंताची सुरुवात असते… आणि या अंताची सुरुवात तुमच्या हलक्या कानांच्या जाड विचारांपासून झालेली असते…

व्यवसायात राजकारण भरपूर असते. राजकारण समजत नसेल तर तुम्ही व्यवसायात यशस्वी होण्याची शक्यता नगण्यच असते. वर सांगितलेल्या तीन गोष्टी प्रातिनिधिक आहेत. अशा कितीतरी खेळ्या आपल्या (अ)हितचिंतकांकडून सतत खेळल्या जातात… एखाद्या बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे तुम्हाला पुढच्याची चाल समजून आपल्या चाली आखाव्या लागतात. हा खेळ सोपा नाही, जो मानसिकदृष्ट्या सक्षम असेल तोच या पाटावर राज्य गाजवतो. आणि या सक्षमतेसाठी सर्वात महत्वाचा गुण आहे तो म्हणजे “तुम्ही हलक्या कानाचे असू नये”…

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Shrikant Avhad

संस्थापक - उद्योजक मित्र Entrepreneur, Consultant, Writer, Speaker...

View all posts by Shrikant Avhad →

One thought on “हलक्या कानाचे बनू नका. व्यवसायातले राजकारण समजून घ्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!