शेअर बाजारात मोठी घसरण


शुक्रवारच्या धक्क्यांनंतर शेअर बाजारात आजही मोठी पडझड झाली. दिवसाअखेर सेन्सेक्समध्ये ५३६ अंकांची तर निफ्टीत १७५ अंकांची घसरण झाली. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता पसरली आहे.

आज शेअर बाजाराची सुरुवात घसरणीनेच झाली. बँकिंग क्षेत्रामधील अॅक्सिक बँक, येस बँक, एचडीएफसी बँक, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, कोटक बँकच्या शेअर्समध्ये घसरण झाली. तसेच कोल इंडिया, एनटीपीसी, टाटा स्टील, सन फार्मा, रिलायन्स, भारती एअरटेल, टीसीएसचे शेअरर्सही स्थिर नाहीत. बँकांच्या वाढत चाललेल्या NPA मुळे बँकिंग सेक्टर चिंतेत आहे. बँकांची पडझड आणि शुक्रवारपासून सुरु झालेली NBFC ची मोठी पडझड याचा मार्केटवर परिणाम पाहायला मिळाला. आगामी आठवडाभर शेअर बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळतील, असे जाणकारांचे मत आहे.

बँकिंग सेक्टरसोबतच डॉलरच्या तुलनेत रुपयाची सतत होणारी घसरण हेही या घसरणीमागचे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.

उद्योजक मित्र फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लिक करा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!