रुपयाचे ऎतिहासिक अवमूल्यन, आंतरराष्ट्रीय बाजारात सुरु झालेली पडझड याचा परिणाम आज शेअर बाजारात मोठी पडझड झाली.
शेअर बाजार आज सुरू होताच सेन्सेक्स १००० अंकांनी गडगडला तर निफ्टीमध्येही ३०० पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली.
गेले काही दिवस शेअर मार्केटमध्ये पडझड सुरु असतानाच बुधवारी शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्सने ४६१ अंकांची झेप घेतली होती. त्यामुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला होता. मात्र, आज गुरुवारी शेअर मार्केट सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण झाली आणि गुंतवणूकदारांना पुन्हा पडझडीच्या त्सुनामीचा तडाखा बसला.
बुधवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य १८ पैसांनी भक्कम झाले होते. मात्र, आज रुपयानेही ऐतिहासिक तळ गाठला. २६ पैशांच्या घसरणीसह रुपयाने ७४. ४६ हा ऐतिहासिक नीचांक गाठला.