चीन चा नऊ वर्षातील नीचांकी विकासदर


चीन ने जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत ६.५ इतका विकासदर नोंदवला आहे. मागील नऊ वर्षातील हा नीचांकी विकासदर आहे. चीनच्या नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सने (एनबीएस) ही आकडेवारी घोषित केली. अमेरिकेच्या व्यापार युद्धाचा चीन वर परिणाम झाल्याचे हे निदर्शक आहे असे मानता येईल.

जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून या तिमाहींमध्ये चिनी अर्थव्यवस्थेने अनुक्रमे ६.८ व ६.७ टक्के विकासदर नोंदवला होता. मात्र जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीत जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या या अर्थव्यवस्थेपुढे व्यापारयुद्धाचे आव्हान उभे ठाकले. ‘चीनपुढे सध्या जागतिक व देशांतर्गत अशा दोन्ही आघाड्यांवर आव्हाने निर्माण झाली आहेत, असे मत एनबीएसचे प्रवक्ता माओ शेनग्याँग यांनी व्यक्त केले.

चीन चा खालावलेला विकासदर जागतिक अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा बानू शकते याची जगभरातील अर्थतज्ज्ञांना, देशांना खात्री आहे. यामुळेच व्यापार युद्ध संपवण्यासाठी जगभरातून अमेरिकेवर दबाव येत आहे. परंतु अमेरिकेचा हट्टाग्रह पाहता व्यापार युद्ध आणखी वाढण्याचीच शक्यता आहे. याचा परिणाम जगभरातील मुख्य देशांच्या अर्थव्यवस्थांवर होण्याची शक्यता आहे.
_

उद्योजक मित्र

उद्योजक मित्र फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लिक करा


Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!