घरगुती स्तरावरील लघुद्योग : भाजीपाला, फळे विक्री


भाजीपाला, फळे विक्री व्यवसाय

भाजीपाला व फळे विक्री क्षेत्रात व्यवसायाच्या चांगल्या संधी आहेत. स्वच्छता, गुणवत्ता आणि केमिकल रहित हि या व्यवसायाची बलस्थाने आहेत. शहरी भागात चांगले शॉप सेटअप करून भाजीपाला विक्री करणारे व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. ग्राहकांचा ओढा या व्यावसायिकांकडे चांगला आहे. स्वच्छता गुणवत्ता असेल तर ग्राहक भावात घासाघीस सुद्धा करत नाही. तसेच बाजारात जाण्याची इच्छा नसलेला वर्गही मोठ्या प्रमाणावर शॉप मधून खरेदी करणे पेस्ट करतो.

सुरुवात करण्यापूर्वी भाजीपाला, फळे यांच्या मार्ककेटची माहिती करून घ्यावी. तसेच गुणवत्तेची सुद्धा पूर्ण माहिती घ्यावी. दर कसा कमी जास्त होतो, आपला नफा कसा ठरवा लागेल याची माहिती करून घ्या. यांनतर स्थानिक शेतकऱ्यांकडून किंवा बाजारपेठेतून ठोक भावात भाजीपाला फळे खरेदी करून किरकोळ मार्केट मध्ये विक्री करावी. नफा चांगला आहे आणि ग्राहकांची कमतरता नाही. फक्त एखादा चांगला ब्रँड तयार करावा. भाजीपाल्यासाठी ब्रँड बनवून विक्री केल्यास चांगले मार्केट मिळेल. मार्केटिंग वर भर द्यावा. परिसरात होम डिलिव्हरी दिल्यास शॉप सेटअप ची गरज पडणार नाही तसेच कालांतराने संपूर्ण शहरभर होम डिलिव्हरी सुरु करता येईल. शॉप सेटअप न करता तुम्ही एखाद्या रिक्षा-टेम्पो ला स्टॅन्ड बनवून फिरत्या गाडीवरूनही विक्री करू शकता. दररोज एका चांगल्या मार्केटमध्ये काही तास थांबलात तरी चांगला धंदा होईल.

गुंतवणूक –
खूपच कमी गुंतवणुकीत विचार केला तर ५-१० हजारातही सुरुवात करता येईल.
चांगला ब्रँड तयार करण्याची इच्छा असल्यास रु. २५-३० हजार
शॉप सेटअप करणार असाल तर शॉप साठी जो खर्च येईल तो अतिरिक्त

मार्केटमधील संधी ओळखा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

उद्योजक मित्र

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


One thought on “घरगुती स्तरावरील लघुद्योग : भाजीपाला, फळे विक्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!