सॉफ्ट टॉईज ला मार्केट मध्ये नेहमीच मागणी असते. त्यामुळे इथे मंदी अशी कधी जाणवत नाही. या क्षेत्रात व्यवसायाला भरपूर संधी उपलब्ध आहेत.
व्यवसाय अगदी सोपा आणि सुटसुटीत आहे. तुम्ही सॉफ्ट टॉईज स्वतः बनवून विकू शकता किंवा होलसेल रेट मध्ये आणून स्थानिक मार्केट मध्ये विक्री करू शकता. स्वतःचे दुकान किंवा स्थानिक खेळणी विक्रेत्यांना विक्री करू शकता. स्वतः बनवले तर स्थानिक विक्रेत्यांना विक्री करणे सोपे जाईल. पण सुरुवातीला शक्यतो ट्रेडिंग करावी. कारण उत्पादनासाठी तेवढा अनुभव असणे आवश्यक आहे, तसेच कामगारांना सांभाळावे लागते. त्यापेक्षा सुरुवातीला काही काळ ट्रेडिंग जास्त चांगले आहे. किंवा लहान, घरगुती स्तरावर उत्पादन सुरु करावे. कालांतराने मोठ्या स्तरावर उत्पादन युनिट सुरु करू शकता
अपेक्षित गुंतवणूक –
रु. १०-२० हजार, स्वतः बनवणार असाल तर. पण यासाठी तुम्हाला सॉफ्ट टॉईज बनवणे शिकून घ्यावे लागेल. घरगुती स्तरावर चांगला उद्योग उभा राहू शकतो. टॉईज बनवून तुम्ही थेट ग्राहकांना विकू शकता किंवा स्थानिक मार्केट मधे रिटेलर्स ना विक्री करू शकता.
रु. १५-४० हजार, होलसेल मध्ये खरेदी करणार असाल तर (रिटेल शॉप विक्री साठी)
शॉप उपलब्ध नसेल तर त्यासाठी लागणार खर्च अतिरिक्त असेल.
मार्केटमधील संधी ओळखा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा… _
उद्योजक मित्र
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील