Paytm चे संस्थापक अध्यक्ष विजय शर्मा यांना मागितली 20 कोटींची खंडणी, सेक्रेटरीने रचला कट


देशातील आघाडीची ई वॉलेट कंपनी Paytm चे संस्थापक अध्यक्ष विजय शेखर शर्मा यांच्याकडे २० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. पेटीएमचे संस्थापक अध्यक्ष विजय शर्मा यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांनीच ही खंडणी मागितली होती. कंपनीचा चोरलेला महत्वपूर्ण आणि गोपनीय डेटा लीक करणार असल्याची धमकी या कर्मचाऱ्यांनी कंपनीचे मालक विजय शेखर शर्मा यांना दिली होती. विशेष म्हणजे त्यांच्या महिला सेक्रेटरीनेच हा मास्टर प्लॅन रचला होता.

विजय शेखर शर्मा यांची सेक्रेटरी असलेल्या महिला कर्मचाऱ्यानेच हा मास्टर प्लॅन आखला होता. पेटीएमच्या युजर्सची माहिती लीक करुन कंपनीची प्रतिमा मलिन करण्याची आणि कंपनीला नुकसान पोहोचविण्याची धमकी या तिघांनी दिली होती. कंपनीच्या नोएडा येथील मुख्य कार्यालयातील या तीन कर्मचाऱ्यांना सेक्टर २० पोलीस स्थानकातील पथकाने अटक केली आहे.

उद्योजक मित्र फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लिक करा


Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!