व्यवसायातील घोडचूका (भाग १) – मोठेपण दाखवण्याचा हव्यास…


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : श्रीकांत आव्हाड
======================

मोठेपण दाखवण्याचा हव्यास…

व्यवसायात नवीन नवीन असताना प्रत्येकाच्या डोक्यात एक खुळ असतं…. एकाच नावाने जास्तीत जास्त व्यवसाय सुरु करणे.. XYZ गृप ऑफ बिझनेस, ग्रुप ऑफ कंपनीज वगैरे असली नावे देणे. आयुष्यातला पहिला व्यवसाय सुरु केला कि लगेच असले ग्रुप दाखवण्याचे उद्योग सुरु होतात. याचे कारण आहे जनमाणसात असणारा व्यवसायाचा फोबीया. व्यवसाय सुरु केला की लोक किंमत कमी करतात, कमी दर्जाचा समजतात, लायकी काढतात, कित्येक वेळा व्यवसाय म्हटल्यावर तरुण वयात लग्नासाठी मुलगी सुद्धा कुणी देत नाही… मग यावर उपाय काय ? तर यासाठी आपले भरपुर व्यवसाय दिसले तरच आपण मोठे उद्योजक वाटु या मानसिकतेतुन ही गृप ऑफ कंपनीज् ची झंजट सुरु होते. हे खुळ माझ्याही डोक्यात होतं, आणि असले प्रकार मिसुद्धा केलेत. पण वर्षभरात सावरलो ईतकीच काय ती समाधानाची बाब.

सगळ्याच व्यवसायांना एकच नाव, सगळ्यांची मिळुन एकच वेबसाईट… मग लोक आपल्याला मोठ्या उद्योजक म्हणतील ही अपेक्षा… प्रत्येकाच्याच डोक्यात हा विचार चालु असतो. या नादात घाई गडबडीत दोन तीन व्यवसाय सुरु केले जातात, प्रत्येकात भरमसाठ पैसा ओतला जातो… एवढे व्यवसाय आहेत म्हटल्यावर श्रीमंती सुद्धा दिसली पाहिजे… मग लगेच एखादी मोठी गाडी घेतली जाते. गाडीच्या मागच्या काचेवर ग्रुप ऑफ बिझनेस चा भाला मोठा लोगो लावला जातो. आणि आपण थोड्याच कालावधीत एक मोठे उद्योजक म्हणून वावरायला लागतो. फक्त वावरायला लागतो… लोक आपल्याला मोठा उद्योजक समजतात असे नाही.

पैशाच्या मुक्त पुरवठ्यामुळे सुरवातील सगळं काही सुरळीत चालल्यासारखं वाटतं. पण लवकरच आपल्याला अद्दल घडण्याची प्रक्रिया सुरु होते. अनुभवाच्या अभावापायी हळुहळु एक एक व्यवसाय जमिनीवर यायला लागतो. दोन वर्षात चित्र एकदम विरुद्ध दिसायला लागतं. प्रत्येक व्यवसाय तोट्यात दिसतो. अनुभव आणि नियोजनाच्या अभावामुळे कोणत्याच व्यवसायाला पुरेसा वेळ देता येत नाही. पसारा दाखवण्यासाठी विविध खर्च वाढवून ठेवलेले असतात. हळूहळू आर्थिक अडचणी वाढायला लागतात. खर्चापेक्षा उत्पन्न कमी व्हायला लागतं. स्वतःला मोठं दाखवण्याच्या हव्यासामुळे आता वास्तव कुणाकडे सांगता येत नाही. मग हे मोठेपण टिकविण्यासाठी कुठुनतरी पैसे उभारायचे, ते परत करत बसायचे. या नादात व्यवसाय बाजुलाच रहातो… फक्त पैशावर लक्ष केंद्रीत होतं आणि तेही देणे असलेल्या पैशावर… दोन तीन वर्षात हा गृप ऑफ बिझनेस फक्त गाडीच्या मागच्या काचेवर आणि वेबसाईटवरच रहातो.

हि तुमच्या व्यवसायिक आयुष्यातली सर्वात मोठी घोडचूक असते. मोठेपण दाखवण्याचा हव्यास.

पण मोठं दिसण्याच्या हव्यासापायी झालेल्या या ट्रॅजेडीनंतर सुरु होतो खरा प्रवास. जर तुमची चुका मान्य करण्याची तयारी असेल, अपयश सहन कारण्याची मानसिकता असेल, यश सावरून पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची तयारी असेल तर पुढे तुमच्यासाठी नक्कीच एक उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी असते. आत्तापर्यंत तुम्ही मोठं दिसण्यासाठी प्रयत्न करत असतात, आता तुम्ही मोठं होण्याच्या मार्गाला लागलेले असतात. हा प्रवासही त्यांचाच सुरु होतो ज्यांची आत्मपरिक्षणाची तयारी असते, अपयश मान्य करण्याची तयारी असते…. अशांना या दोन तीन वर्षात व्यवसाय म्हणजे काय याची चांगली जाण आलेली असते. मागच्या चुका पुन्हा न उगाळता मग हे नवउद्योजक एका वेळी एक व्यवसाय या नियमाने पुढचा प्रवास सुरु करतात. मोठेपण दाखवण्यापेक्षा व्यवसाय मोठा करण्यावर लक्ष केंद्रित करतात. पैशाच्या देखाव्यापेक्षा प्रत्यक्ष पैसे कमावण्यावर लक्ष केंद्रित करतात. एक व्यवसाय यशस्वी झाला कि मग दुसऱ्या व्यवसायाच्या मागे लागतात. अनुभव आल्यामुळे सर्व व्यवसायांचे योग्य नियोजन करतात. एक व्यवसाय मोठा झाला कि हळूहळू इतर व्यवसाय उभे राहतातच… म्हणजेच ग्रुप ऑफ बिझनेस चं स्वप्न आपोआपच प्रत्यक्षात यायला लागतं. आणि आता हे उद्योजक अशा लेव्हल पोचतात कि ग्रुप ऑफ बिझनेस, ग्रुप ऑफ कंपनीज असल्या गोष्टींना महत्व देण्यापेक्षा व्यवसाय जास्तीत जास्त मोठे कसे होतील यावर फक्त लक्ष केंद्रित करतात.

हे अपयश तुम्हाला हुशार बनवतं यात शंका नाही… पण यात तुमचे काही वर्षे विनाकारण वाया जातात… हा वाया जाणारा काळ वाचावा म्हणून हि व्यवसायातील घोडचूका मालिका मी लिहीत आहे. आपण व्यवसाय करत असताना अशा काही चुका करतो कि त्यामुळे आपला वेळ पैसे वाया जातोच पण आपण काही वर्षे मागे जातो… व्यवसायातील घोडचूक या लेखमालिकेमुळे व्यवसायाच्या सुरुवातीपासूनच तुम्ही बऱ्याच चुका टाळण्याचा प्रयत्न कराल आणि जास्तीत जास्त योग्य पद्धतीने व्यवसाय कराल हि अपेक्षा आहे.

मोठेपण दाखवण्यापेक्षा मोठे होण्याला प्राधान्य द्या… तुमचं मोठेपण आपोआपच लोकांना दिसेल.

व्यवसाय साक्षर व्हा…
उद्योजक व्हा…
समृद्ध व्हा…
_

श्रीकांत आव्हाड
७७४४०३४४९०

Business Consultant
www.ShrikantAvhad.com

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


8 thoughts on “व्यवसायातील घोडचूका (भाग १) – मोठेपण दाखवण्याचा हव्यास…

  1. मुद्देसुद आणि डोक्यातील हवा काढ़नारी माहिती… छान आहे.

  2. Thanks sir मला सावध केल्याबद्दल मी हि असेच काही चुकीचे निर्णय घेण्याच्या तयारीत होतो……

  3. धन्यवाद ,सध्या EMI च्या विळख्यात सापडलोय.व्यवसाय वाढीसाठी बँकेच्या नादाला लागून व्याज आणि भाड्यातच पैसा चाललाय.या चक्रव्युहातुन बाहेर पडायचा मार्ग सुचवा.

  4. एकदम बरोबर आहे. माझे sadhya असेच झाले but माझ्या सोबत politicians झाल्या मुळे खूप डिप्रेशन मध्ये आहे, but mala त्या व्यवसाय मधील आणू रेणू पासून माहिती आहे, but आता आर्थिक बाजू कमकुवत झाली आहे, त्यावर सोल्यूशन कसे निघेल याची मदत केली tr चांगले होईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!