फ्लिपकार्टचे संस्थापक CEO बिन्नी बन्सल यांचा राजीनामा


फिल्पकार्टचे सहसंस्थापक व CEO बिन्नी बन्सल यांनी मंगळवारी तडकाफडकी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाचा राजीनामा दिला.

वॉलमार्टने फ्लिपकार्ट खरेदी केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच बिन्नी बन्सल यांच्यावर गंभीर गैरवर्तणुकीचे आरोप झाले होते. त्यासंदर्भात फ्लिपकार्ट आणि वॉलमार्टकडून त्यांची स्वतंत्र चौकशी करण्यात आल्यानंतर त्यांनी पदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. फिल्पकार्टवर आता वॉलमार्टचे नियंत्रण असून फिल्पकार्टचे ७७ टक्के मालकी हक्क वॉलमार्टकडे आहेत. यावर्षी मे महिन्यात हा विक्रीचा व्यवहार झाला.

बिन्नी बन्सल यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. फ्लिपकार्ट ग्रुपच्या सीईओ पदाचा आपण राजीनामा देत आहोत अशी घोषणा बिन्नी बन्सल यांनी सकाळी केली. तथापि बिन्नी यांच्यावरील आरोपांना पुष्टी देणारे कोणतेही पुरावे तपास करणाऱ्या समितीला आढळले नाहीत.

कंपनीच्या स्थापनेसापासून बन्सल यांची कंपनीमध्ये महत्वाची भूमिका होती. वॉलमार्टने फ्लिपकार्टमध्ये मोठा हिस्सा खरेदी केला त्यावेळी सहसंस्थापक सचिन बन्सल यांनी स्वत:चा पाच टक्क्यापेक्षा जास्त हिस्सा सात हजार कोटींना विकला व कंपनीतून बाहेर पडले. पण बिन्नी यांनी स्वत:चा ५.५ टक्के हिस्सा राखून ठेवला होता. सचिन आणि बिन्नी बन्सल यांनी २००७ साली अवघ्या चार लाख रुपयांच्या भांडवलावर फ्लिपकार्ट कंपनी सुरु केली होती.

उद्योजक मित्र फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लिक करा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!